शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर अपघातांची मालिका

By admin | Updated: July 18, 2016 02:37 IST

सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा उड्डाणपुलाजवळ शनिवारी रात्री मिक्सर डंपरचा अपघात झाला.

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा उड्डाणपुलाजवळ शनिवारी रात्री मिक्सर डंपरचा अपघात झाला. विद्युतदिवे बंद असल्याने व परावर्तक पट्ट्याही नसल्यामुळे अपघात झाला आहे. महामार्ग रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे हे अपघात होत आहेत. सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर अपघात व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. परंतु यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्यापेक्षा वाढला आहे. सानपाडा दत्तमंदिरकडून पुढे उड्डाणपूल असल्याचे सूचना फलक नाहीत. परावर्तक पट्टे, ब्लिंकर्सही बसविण्यात आले नाहीत. काही महिन्यांपासून येथील पथदिवे बंद आहेत. यामुळे रात्री वाहने उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून अपघात होत आहेत. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता सिमेंट मिक्सरचा डंपर कठड्याला धडकून पलटी झाला. यामुळे वाशीकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प होती. सानपाडा पोलीस स्टेशन व तुर्भे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून वाहतूक सुरळीत केली. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावरील अपघात वाढत आहेत. भविष्यात गंभीर अपघात होवून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी अपघात झालेले वाहन रविवारी सायंकाळपर्यंत त्याच ठिकाणी उभे होते. यामुळे पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मोठा अपघात झाला तर अपघातग्रस्त वाहने तत्काळ रोडवरून बाजूला नेवून उभी करण्याची यंत्रणा असली पाहिजे. परंतु याविषयी कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.