शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

मुलासाठी विभक्त पती-पत्नी पुन्हा एकत्र!

By admin | Updated: May 9, 2016 04:02 IST

हुंड्यावरून वाढलेल्या वादामुळे विभक्त झालेल्या या पती-पत्नीने केवळ मुलाच्या भविष्यासाठी पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले आहे. न्यायालयानेही त्यांच्या पुनर्मीलनाला हिरवा कंदिल दाखविला आहे.

नागपूर : घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये अपत्याची होणारी ससेहोलपट टाळण्यासाठी नागपुरातील एका दाम्पत्याने स्तुत्य निर्णय घेतला आहे. हुंड्यावरून वाढलेल्या वादामुळे विभक्त झालेल्या या पती-पत्नीने केवळ मुलाच्या भविष्यासाठी पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयानेही त्यांच्या पुनर्मीलनाला हिरवा कंदिल दाखविला आहे.प्रकरणातील पती-पत्नी विभुष व अमृता नागपूरचे रहिवासी आहेत. ९ मे २०११ रोजी त्यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगा आहे. लग्नानंतर विभुष व त्याचे नातेवाईक अमृताला हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. यामुळे अमृताने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी विभुष व त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा नोंदविला, तसेच चौकशीनंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. हा खटला प्रलंबित असताना, वाद परस्पर सहमतीने मिटविण्यासाठी हे प्रकरण मध्यस्थीसाठी पाठविण्यात आले. यात विभुष व अमृताने मुलाच्या भविष्यासाठी वाद संपवून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, परंतु फौजदारी खटला प्रलंबित असल्यामुळे त्यांचे समाधानाने जगणे अशक्य होते. यामुळे त्यांनी हा खटला रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर केला होता. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी ‘बी. एस. जोशी वि. हरयाणा शासन’ या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा अर्ज मंजूर केला. त्यामुळे हे प्रकरण सामोपचाराने मिटवून या दाम्पत्याचा संसार पुन्हा नव्याने सुरू झाला. (प्रतिनिधी)