शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७00 रुपयांसाठी दीड वर्षे कारागृहात काढल्यानंतर आरोपी निर्दोष!

By admin | Updated: April 8, 2016 02:10 IST

१३ साक्षीदार जबाबावर कायम; तरीही सबळ पुरावा नाही.

अकोला: बौद्ध विहारातील ७00 रुपयांच्या चोरी प्रकरणात दीड वर्षांपासून कारागृहात असलेल्या आरोपीची प्रथम श्रेणी न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. तेरा साक्षीदार जबाबावर कायम असतानाही सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने आरोपीची सुटका केली.शंकरनगरमध्ये असलेल्या बौद्ध विहारात ४ जानेवारी २0१५ रोजी ७00 रुपयांची चोरी केल्याचा आरोप बिहारचा रहिवासी राजीव छोटू तांबूल याच्यावर होता. या प्रकरणी राजकुमार रंगारी यांनी आकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तांबूल याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीकडून ५८0 रुपये रोख जप्त करून त्याला अटक केली. ४ जानेवारी २0१५ पासून आरोपी अद्यापही कारागृहात आहे. सरकार पक्षाने कलम ३८0 नुसार गुन्हय़ात वाढ केली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रांजली राणे यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने एकूण १३ साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदार जबाबावर कायम राहिले. जप्तीतील ५८0 रुपयेही न्यायालयात सादर करण्यात आले; मात्र सरकार पक्ष सबळ पुरावे सादर करण्यास, तसेच गुन्हा सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ए. के. अनोकार यांनी, तर आरोपीतर्फे अँड. केशव एच. गिरी व वैशाली गिरी भारती यांनी कामकाज पाहिले. आरोपी राजीव तांबूल याला न्यायालयाने निर्दोष ठरवले असले, तरी त्याला अटक केल्यानंतर जमानतदारच न भेटल्याने तो एक वर्षे ४ महिन्यांपासून कारागृहात होता.