मुंबई : शुक्रवारी शेअर बाजारांत नरमाईचा कल दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरले. रुपयातील घसरण, कडक केलेल्या पी-नोटस्विषयक नियमांची भीती, तसेच अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता यामुळे बाजार घसरल्याचे सूत्रांनी सांगितले. सेन्सेक्स ९७.८२ अंकांनी अथवा 0.३९ टक्क्यांनी घसरून २५,३0१.९0 अंकांवर बंद झाला. त्या आधीच्या दोन सत्रांत सेन्सेक्स ३७९.८९ अंकांनी घसरला होता. एनएसई निफ्टी ३३.७0 अंकांनी घसरून ७,७४९.७0 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स ९८ अंकांनी घसरला
By admin | Updated: May 21, 2016 05:23 IST