शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्याविरोधात संवेदनशील मने सरसावली!

By admin | Updated: May 14, 2017 04:55 IST

हुंड्यामुळे लग्न होत नसल्याच्या कारणावरून लातूर तालुक्यातील भिसे वाघोलीच्या शीतल वायाळ या मुलीने मरणाला कवटाळले.

राजकुमार जोंधळे,लातूर- हुंड्यामुळे लग्न होत नसल्याच्या कारणावरून लातूर तालुक्यातील भिसे वाघोलीच्या शीतल वायाळ या मुलीने मरणाला कवटाळले. या घटनेने सर्वच स्तरातील संवेदनशील मनांच्या माणसांचे काळीज चिरले. शीतल वायाळची पुनरावृत्ती होऊ द्यायचीच नाही, असा निर्धार करीत लातूरकरांनी आता हुंड्याविरोधात एल्गार पुकारला आहे. हुंड्यामुळे आपल्या जन्मदात्याला किती अपमान सहन करावा लागतोय. शिवाय हुंड्यामुळेच आपले लग्न होत नाही, या विवंचनेतून शीतलने टोकाचे पाऊल उचलले. मात्र, मरणापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेने लातूरकरांना हुंडाविरोधी चळवळीसाठी प्रवृत्त केले. जिल्ह्याच नव्हे तर, महाराष्ट्रात शीतल वायाळची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता हुंडाविरोधी वधू-वर सूचक मंडळाची स्थापनाही केली आहे. या चळवळीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मंडळाच्या, चळवळीतील प्राचार्य संग्राम मोरे, सचिन इंगळे, सुमेधा इंगळे, अजय सूर्यवंशी, सुप्रिया सूर्यवंशी आदींसह इतर कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हुंडाविरोधी चळवळीला अधिक गती देण्याचाही प्रयत्न प्रा. संग्राम मोरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘नो हुंडा डॉट कॉम’ या संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात आली आहे.तरुणांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न...हुंडाविरोधी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन, जागृती करणार आहोत. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहोत, अशी माहिती प्रा. संग्राम मोरे यांनी दिली.