शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
4
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
5
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
6
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
7
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
8
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
9
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
10
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
11
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
12
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
13
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
14
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
15
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
16
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
18
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
19
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
20
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू

आत्महत्येच्या इशाऱ्याने नवी मुंबईत खळबळ

By admin | Updated: August 5, 2016 02:30 IST

वाघिवली गावामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे पूर्ण गावानेच शासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

नवी मुंबई : वाघिवली गावामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे पूर्ण गावानेच शासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. या वृत्ताने नवी मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांची भेट घेवून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. शासनाने नवी मुंबई वसविण्यासाठी ठाणे, पणवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. ४५ वर्षांनंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. सर्वात गंभीर स्थिती पनवेल तालुक्यामधील वाघिवलीमधील प्रकल्पग्रस्तांची आहे. येथील ६६ कुळांची नावेच सातबाऱ्यावरून वगळण्यात आली आहेत. तब्बल १५२ एकर जमीन संपादित करून त्याचा काहीही मोबदला दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के योजनेचा लाभ सावकाराला देण्यात आला असून त्याने मिळालेले भूखंड परस्पर विकले आहेत. पाठपुरावा करूनही सिडको व शासनाकडून न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी असा अर्ज मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. प्रकल्पग्रस्त संघटनांनी वाघिवली ग्रामस्थांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. वाघिवली ग्रामस्थांच्या इशाऱ्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. एनआरआय पोलिसांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले होते. ग्रामस्थांशी संवाद साधून आत्महत्या करण्यापासून परावृत्त व्हावे असे सांगितले. परंतु ग्रामस्थांनी आत्महत्येच्या मुद्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. वडिलोपार्जित जमीनही गेली व मोबदलाही मिळालेला नाही. यामुळे शासनाने आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही आत्महत्या करणार असे स्पष्ट केले आहे. यामुळे भविष्यात हा संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन व सिडको प्रशासन याविषयी काय भूमिका घेणार याकडे आता ग्रामस्थांसह सर्व प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)