शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

सेनेच्या आरती बोरकरांची हत्या

By admin | Updated: August 3, 2014 01:01 IST

काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या लालगंज परिसरातील शिवसेनेच्या माजी पदाधिकारी आरती बोरकर यांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचे पती अनिल बोरकर

लालगंज परिसरात जाळपोळ : इतवारी, मस्कासाथ बंदनागपूर : काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या लालगंज परिसरातील शिवसेनेच्या माजी पदाधिकारी आरती बोरकर यांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचे पती अनिल बोरकर गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेततही अनिल आणि त्यांच्या साथीदारांनी एका हल्लेखोराला पकडले. काळाबाजार करणारे रॉकेल माफिया आणि चटणी डेपो चालकांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे. पोलीस सूत्रांनुसार आरती बोरकर यांची शिवसेनेच्या आक्रमक पदाधिकारी म्हणून ओळख होती. त्या मध्य नागपूर महिला आघाडीच्या प्रमुख होत्या. परिसरात काळाबाजार करणाऱ्यांच्या विरोधात त्या लढत होत्या. त्यांच्या आंदोलनामुळे रवि खंते यांचा रॉकेल डेपो आणि केशरवानी कुटुंबीयांचा मिरची पावडरचा (चटणी) डेपो बंद पडला होता. त्यामुळे ते बोरकर यांच्यावर चिडून होते. या वैमनस्यातूनच आरती बोरकर व त्यांचे पती अनिल बोरकर यांच्या खुनाची सुपारी हल्लेखोरांना देण्यात आल्याची तक्रार जखमी अनिल बोरकर यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर शुक्रवारी रात्री मेयो रुग्णालयात तणाव होता. राऊत चौकातही शनिवारी सकाळपासून तणाव पसरला होता. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. आरती बोरकर यांना ११ व ९ वर्षाची दोन मुले आहेत. अनिल बोरकर यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. सूत्रांनुसार लालगंज परिसरातील राऊत चौकात आरती अनिल बोरकर यांचे घर आहे. रात्री जेवण झाल्यानंतर आरती या पती अनिलसोबत चौकात विकास मोटघरे यांच्या घरासमोर बोलत उभ्या होत्या. ९ .१५ वाजताच्या दरम्यान अ‍ॅक्टीव्हा गाडीवर स्वार होऊन आरोपी आकाश दोरखंडे व त्याचे साथीदार आले. मेयोमध्ये शिवसैनिकांची गर्दी आरती बोरकर यांची हत्या करण्यात आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. शिवसेना नेते शेखर सावरबांधे, सुरज गोजे यांच्यासह शेकडो शिवसैनिक मेयो रुग्णालयात जमा झाले. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कार्यकर्ते संतापले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत केले. धारदार शस्त्रांनी हल्लाधारदार शस्त्रांनी अनिलवर हल्ला करण्यात आला. पत्नी आरती त्यांना वाचविण्यासाठी धावल्या त्यांनी एका आरोपीला पकडले. त्यामुळे आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडले व शस्त्रांनी वार करून त्यांचा खून केला. अनिल यांनी दाखविली हिंमत अनिल आणि आरती यांच्यावर हल्लेखोर वार करीत असताना शेकडो लोक मूकदर्शक बनून उभे होते परंतु कुणीही वाचवण्यासाठी पुढे यायला तयार नव्हते. अनिल यांनी हिंमत दाखवित जखमी अवस्थेतही आकाश दोरखंडेला जखडले. अनिलची हिंमत पाहून विकास मोटघरे व इतरही पुढे आले. अचानक शेकडो लोक आरोपींवर धावून गेले. लोक येत असल्याचे पाहून दोन आरोपी पळाले. परंतु आकाशला अनिलने पकडून ठेवल्याने त्याची नागरिकांनी चांगलीच धुलाई केली. संतापलेल्या नागरिकांच्या मारामुळे आरोपीची वाचण्याची शक्यता कमीच होती. परंतु घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्ती करून आरोपीला वाचविले. त्यानंतर आरती व अनिल यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आरती यांना तपासून मृत घोषित केले. इतवारी बंद दरम्यान दुपारी आरती बोरकर यांच्या अंत्ययात्रेदरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण होते. शिवसैनिकांनी इतवारी बाजार बंद पाडला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवून या घटनेचा निषेध करण्यात आला. पाचपावली पोलीस ठाण्यावरही शिवसैनिकांनी धडक दिली. शिवसैनिकांचा संताप लक्षात घेता पोलीसही कामाला लागले. आकाश दोरखंडे या आरोपीला नागरिकांनीच पकडले होते. त्याचे साथीदार सुपारी किलर विशाल ऊर्फ सोनू मोहनदास खरे, विक्की राजू खरे आणि सुपारी देणारे सुरेंद्र केशरवानी यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)