शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के लक्ष्मण कालवश

By admin | Updated: January 27, 2015 15:31 IST

ख्यातनाम व्यंगचित्रकार आर.के लक्ष्मण यांचे पुण्यात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले असल्याचे वृत्त टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीने दिले आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ - ख्यातनाम व्यंगचित्रकार आर.के लक्ष्मण यांचे पुण्यात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आठ दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आर.के. लक्ष्मण फुफ्फुस व किडनीच्या विकाराने त्रस्त होते. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांचे डायलिसिस करण्यात आल्याचे समजते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रामुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. त्याचप्रमाणे 'टनेल ऑफ टाइम' हे आत्मचरित्र मराठीत ' लक्ष्मण रेषा' म्हणून प्रसिद्ध आहे. २०१० साली झालेल्या पक्षघातामुळे त्यांना नीट बोलता येत नव्हते. परंतु त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या रेखाटनामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही.
रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असे त्यांचे पूर्ण नाव होते. २४ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसुर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील एका महाविद्यालयात प्राचार्य होते. अतिशय सुशिक्षित आणि समृद्ध अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मोठे बंधु प्रसिध्द लेखक आर.के नारायण यांनी त्यांच्यातील व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन दिले.  पुढे मुंबईतील सर जे.जे. कला माहाविद्यालयात व्यंगचित्रकलेसाठी त्यांना प्रवेश नकारण्यात आला होता. पुन्हा म्हैसुर येथे जाऊन त्यांनी बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व मुंबईत आल्यावर अनेक नावाजलेल्या वर्तमानपत्रांतून आपल्या व्यंगचित्रांची भुरळ वाचकांवर कायम ठेवली. त्यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, रेमनमॅगॅसेसे आणि इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले. आर.के नारायण यांच्या मालगुडी डेज या पुस्तकासाठीही त्यांनी व्यंगचित्र काढली होती. 'द सर्व्हंट्स ऑफ इंडिया', हॉटेल रिवेरा या पुस्ताकांव्यतिरिक्त 'द मेसेंजर' व 'द एलोक्युएंट ब्रश' इत्यादी पुस्कं प्रसिद्ध आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय काराकीर्द सुरु होण्यापूर्वी आर. के. लक्ष्मण व बाळासाहेबांनी व्यंगचित्रकार म्हणून एकत्र काम केले होते.२६ जानेवारी २०१५ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ५० वर्षांहून अधिक काळ महत्वाच्या वर्तमानपत्रात ते व्यंगचित्र काढत होते.