शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

ज्येष्ठ व्यंगचित्रकार बापू घावरे कालवश

By admin | Updated: November 9, 2016 05:10 IST

विनोदी लेखक, व्याख्याते आणि आपल्या व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून कधी ओठावर हसू, तर कधी डोळ्यांत आसू आणणारे ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ प्रा. बापू लक्ष्मण घावरे

पुणे : विनोदी लेखक, व्याख्याते आणि आपल्या व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून कधी ओठावर हसू, तर कधी डोळ्यांत आसू आणणारे ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ प्रा. बापू लक्ष्मण घावरे यांचे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. राजस्थानमधील उदयपूर येथे ते सहलीसाठी गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ‘बहुरूपी’ हा त्यांचा कथासंग्रह साहित्य सांस्कृती मंडळाने १९८५ साली प्रकाशित केला. ‘मोहिनीह्ण या दिवाळी अंकात त्यांचे १९८९ मध्ये पहिले व्यंग्यचित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर विविध दैनिकांत आणि दिवाळी अंकांसाठी त्यांनी तेरा हजारांहून अधिक व्यंगचित्रे काढली. त्याची २० प्रदर्शने पुणे शहरात आणि ५ ग्रामीण भागात झाली आहेत. यातील ठराविक व्यंग्यचित्रांची ‘लाफिंग क्लब’ आणि ‘हास्यवाटिका’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे ‘बहुरूपीह्ण आणि ‘शिमग्याची सोंगं’ हे दोन विनोदी कथासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात त्यांनी शिक्षक ते उपप्राचार्य या पदांवर अनेक वर्षे सेवा केली. (प्रतिनिधी)