शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नमुने पाठवून कारण शोधणार

By admin | Updated: February 16, 2016 03:49 IST

गिरगावात रविवारी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात लागलेल्या आगीचे कारण मुंबई पोलीस न्यायवैद्यक प्रयोगशाळेला (एफएसएल) नमुने पाठवून स्वतंत्रपणे शोधणार आहेत.

डिप्पी वांकाणी,  मुंबईगिरगावात रविवारी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात लागलेल्या आगीचे कारण मुंबई पोलीस न्यायवैद्यक प्रयोगशाळेला (एफएसएल) नमुने पाठवून स्वतंत्रपणे शोधणार आहेत. मुंबई पोलीस या आगीची महानगरपालिकेसोबतही चौकशी करीत आहेत. अजूनपर्यंत तरी मुंबई पोलिसांनी आगीबद्दल तक्रार नोंदविलेली नाही. आम्ही कार्यक्रमाचे संघटक आणि प्रत्यक्ष या घटनेच्या साक्षीदारांचे म्हणणे नोंदवून घेणार आहोत आणि आग मुद्दाम कोणी लावली का याचीही चौकशी करणार आहोत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या उप कंत्राटदारांचीही त्यांनी कार्यक्रमात दुय्यम दर्जाचे साहित्य/उपकरणे वापरली का अशीही चौकशी केली जाणार आहे.सध्या आम्ही या घटनेसंदर्भात डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी तयार केली आहे. मुंबई महानगर पालिका आणि अग्निशमन दल हे आगीचे कारण शोधण्यात तज्ज्ञ असून ते आपला अहवाल सादर करतील. तरीही आम्ही न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी नमुने पाठविणार आहोत. कार्यक्रमाचे आयोजक विझक्राफ्ट आणि त्यांचे उपकंत्राटदार यांचे म्हणणे नोंदवून घेणार आहोत. आम्ही ही घटना प्रत्यक्ष बघणाऱ्यांचेही म्हणणे नोंदवून घेणार आहोत, तसेच आमच्या निष्कर्षांनुसार काय कायदेशीर कारवाई करायची याचा निर्णय घेणार आहोत, असे मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ते श्रोत्यांतून ज्यांनी आगीचे व्हिडीओ चित्रीकरण केले ते आग प्राथमिक पातळीवर कशी उघडकीस आली हे तपासण्यासाठी गोळा करीत आहेत. हा आगीचा प्रकार कोणाकडून घातपातासाठी करण्यात आला आहे का हेदेखील आम्ही तपासणार आहोत, असेही हा अधिकारी म्हणाला. उप कंत्राटदाराने वापरलेली उपकरणे दुय्यम दर्जाची होती का व त्यामुळे आग लागली हेही आम्ही तपासून बघणार आहोत, असेही अधिकारी म्हणालाबॅरिकेड्सचा अडथळागिरगाव चौपाटीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारलेले बॅरिकेड्स, मेटल डिटेक्टर, पत्र्यांच्या पार्टिशन्समुळे महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या स्टेजला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलास शर्थीचे प्रयत्न करावे लागले़ अखेर पोलिसांच्या मदतीने बॅरिकेड्स हटविल्यानंतर मदतकार्याला वेग मिळाला, असा अहवाल अग्निशमन दलाने दिला आहे़ या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ वाहतूक कोंडी फोडत घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच अवधी वाया गेल्याचे, अग्निशमन दलाने निदर्शनास आणले आहे़घाईत केली तयारी आयोजक नितीन देसाई यांनी संघटकांकडे व्यासपीठ त्याची रचना करून रविवारी दुपारी साडेचार वाजता सोपविल्यामुळे कार्यक्रमाची अंतिम तयारी घाईघाईत करण्यात आली. नंतरच इतर व्यवस्था कराव्या लागल्या.तंत्र महागात पडलेआग आणि धुराच्या परिणामांसाठी (इफेक्ट्स) वापरण्यात आलेले पायरो तंत्र या शोसाठी खूपच महागात पडले. वाऱ्याची दिशा समुद्राच्या दिशेने होती. ती तशी नसती तर त्यामुळे फार मोठा अपघात घडला असता, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गिरगाव चौपाटीवर रविवारी रात्री ‘महाराष्ट्र रजनी’च्या व्यासपीठाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर, वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’च्या सप्ताहातील अग्निप्रतिबंधक सुरक्षा आणखी चोख करण्यात आली आहे. विशेषत: एमएमआरडीएच्या मैदानावर आग विझवण्यासाठी ५०० साधने आणि ५० फायर मार्शल तैनात करण्यात आले आहेत. शिवाय आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.