शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्री तावडेंना घरी पाठवा

By admin | Updated: March 11, 2016 04:24 IST

मंत्र्यांनी कोणत्याही कंपनीमध्ये संचालक राहता कामा नये, या केंद्र सरकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे अद्याप मंत्रिमंडळात कसे? असा सवाल करत, तावडेंना तत्काळ घरी पाठवा

मुंबई : मंत्र्यांनी कोणत्याही कंपनीमध्ये संचालक राहता कामा नये, या केंद्र सरकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे अद्याप मंत्रिमंडळात कसे? असा सवाल करत, तावडेंना तत्काळ घरी पाठवा, असा हल्लाबोल विरोधी पक्षांनी आज विधानसभेत केला. यावरून झालेल्या गदारोळात कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तावडे यांनी मंत्र्यांसाठीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करीत, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी केली. विखे, चव्हाण, तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह धरला. तावडे यांच्यावर आरोप करण्यासाठी नियम ३५ नुसार आधी नोटीस द्यायला हवी होती, असे सांगत, अध्यक्ष बागडे यांनी विखे पाटील यांनी दिलेली स्थगन प्रस्तावाची सूचना फेटाळली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य वेलमध्ये येऊनतावडेंच्या राजीनाम्याची मागणी करू लागले. यावेळी तावडे सभागृहात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपण या बाबत आजच निवेदन करू असे सांगितले. मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही. मी आजच उत्तर देईन पण आघाडी सरकारच्या काळात किती मंत्री कुठे संचालक होते हेही पहावे लागेल, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाने विरोधक अधिकच संतप्त झाले. हे सुडाचे राजकारण असून हा धमकावण्याचा प्रकार आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला. विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. चवथ्यांदा ते सुरू झाल्यानंतर विरोधकांनी कामकाजात सहभाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)————————————————गोंधळलेले विरोधकमुद्दा सोडतात तेव्हा...काँग्रेस-राष्ट्रवादीतील समन्वयाचा अभाव, विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची कमी पडलेली आक्रमकता याचा अनुभव आज सभागृहात आला. काँग्रेसचे सदस्य दुष्काळाकडे लक्ष वेधणारे फलक घेऊन सभागृहात आले पण विखे यांनी मागणी लावून धरली ती तावडेंच्या राजीनाम्याची! त्यामुळे विरोधकांना नेमके काय हवे आहे, हे समजेना. ‘विरोधक गोंधळलेले आहेत. ते कधी दुष्काळ धरतात, तर कधी मंत्र्यांना पकडतात. जरा पाचदहा मिनिटे विचार करून मग पुन्हा सभागृहा या’ असा टोला महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांना लगावला.