शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस सेनेचे मंत्री निमूटपणे उपस्थित, दसरा मेळाव्याकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 07:02 IST

‘मातोश्री’वर सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा बोलली गेली, आम्ही निर्णय घेण्याच्या टप्प्यात आहोत, असे सांगितले गेले असताना राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीला शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री निमूटपणे हजर होते.

यदु जोशी मुंबई : ‘मातोश्री’वर सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा बोलली गेली, आम्ही निर्णय घेण्याच्या टप्प्यात आहोत, असे सांगितले गेले असताना राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीला शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री निमूटपणे हजर होते.‘मातोश्री’वरील बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी,‘सरकारमध्ये त्यांची कामेच होत नाहीत. भाजपाचे मंत्री त्यांची अडवणूक करतात’ असे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मंत्री आज मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहतील की नाही याची चर्चा होती. १ तास २० मिनिटे मंत्रिमंडळ बैठक झाली. शिवसेनेच्या आमदारांची विकास कामे होत नसल्याची तक्रार सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बैठकीत केली नाही. कुठल्याच निर्णयाला विरोध केला नाही.‘कामेच होत नसतील तर सरकारमधून बाहेर पडा, विरोधी पक्षात राहून काम करू’ असा आग्रह बहुतेक आमदारांनी मातोश्रीवरील सोमवारच्या बैठकीत धरला होता. सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले नाहीत. शिवसेनेचे मंत्री त्यांच्या परवानगीनेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिले. याचा अर्थ केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करतानाच सरकारमध्ये कायम राहण्याकडेच सेना नेतृत्वाचा कल आहे, असे म्हटले जाते. शिवसेना मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला असता तर फडणवीस यांना तो इशारा ठरला असता पण मंत्री हजर राहिल्याने भाजपाशी समन्वयाची भूमिका राहील, असे संकेत शिवसेनेने दिले.फुटीची भीती!फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तर सेनेत फूट पडण्याची शक्यता आहे. एक तृतीयांश आमदार भाजपाच्या गळाला लागले तर त्यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळेल आणि सरकारच्या स्थैर्यावरही विपरित परिणाम होणार नाही. मातोश्रीवरील कालच्या बैठकीत सेनेच्या नेत्यांच्या (मनोहर जोशी, खा.संजय राऊत) भाषणांमध्येही पक्ष सोडून जाणारे संपतात हा अनुभव आहे, असा इशारा देत दुसरीकडे त्यांना चुचकारले होते.>शिवसेनेतील अस्वस्थेतच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ३० सप्टेंबरला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात काय बोलतात याची उत्सुकता असेल. भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा करणार का, ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.