शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचा मोदींबाबतच्या भूमिकेचा घोळ कायम

By admin | Updated: October 16, 2014 05:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करायचे किंवा कसे याबाबत शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मनातील घोळ निवडणुकीच्या अखेरपर्यंत कायम राहिला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करायचे किंवा कसे याबाबत शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मनातील घोळ निवडणुकीच्या अखेरपर्यंत कायम राहिला. मोदींवर टीका करायची आहे; मात्र त्याच्या परिणामांबाबत नेमका अंदाज येत नाही अशा द्विधा मन:स्थितीत शिवसेना गुरफटल्याचे दिसून आले.शिवसेना-भाजपा युती तुटली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करायचे नाही. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना धारेवर धरायचे, असे राजकीय धोरण ठरले होते. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपत्राला मुलाखत देऊन ‘चहावाला पीएम होऊ शकतात तर मी सीएम का होऊ शकत नाही’, अशी शेरेबाजी केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी मोदींच्या ‘चहावाला’ असण्याबाबत उल्लेख केला होता. शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव यांच्या या टीकेचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर रात्री उशिरा मोदींचा ‘चहावालाह्ण हा उल्लेख ठेवायचा की काढून टाकायचा यावरून शिवसेनेत बराच खल सुरु होता. अखेरीस मथळ््यातील ‘चहावालाह्ण हा उल्लेख काढून मुलाखतीच्या एका उत्तरातील उल्लेख ठेवला गेला. शिवसेना नेतृत्वाने मोदींवर अशी टीका केली तर ते आपल्या पथ्यावर पडेल, असे भाजपाच्या नेत्यांना वाटत होते. त्याचवेळी शिवसेनेच्या हिंदी मुखपत्रातील एका स्तंभामध्ये मोदींच्या वडिलांचा अनुदाराने उल्लेख केला गेला. त्याच्याशी आपला संबंध नसून मोदी यांच्याबद्दल आपल्याला आजही आदर आहे, असा खुलासा शिवसेना नेतृत्वाने मंगळवारी दुपारी केला होता. त्यानंतर त्या स्तंभ लेखकाने सर्व जबाबदारी आपली असल्याचे स्पष्ट करून शिवसेना नेतृत्वाची सुटका केली. त्यानंतर लागलीच नवा घोळ सुरु झाला. मोदींवर टीका करायची तर आहे. मात्र त्याचे बुधवारी होणाऱ्या मतदानावर काय परिणाम होतील, याचा अंदाज येत नाही अशा गोंधळात शिवसेना नेतृत्व निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सापडल्याचे दिसले.