शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चोरलेल्या दुचाकींची फक्त १०० रुपयात विक्री,पुण्याचा चोरटा ताब्यात

By admin | Updated: January 12, 2017 23:49 IST

दुचाकी चोरीत अट्टल असलेल्या चोरट्यास जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 12- दुचाकी चोरीत अट्टल असलेल्या समाधान गोकुळ सपकाळे (वय २८ रा.हडपसर, पुणे, मुळ रा.फुपणी,ता. जळगाव) या चोरट्यास जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे शिवाजीनगरातून अटक केली. त्याने आतापर्यंत सुमारे २५ दुचाकी चोरल्या असून त्याची फक्त १०० ते २०० रुपयात विक्री केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

नवी पेठेतील राठी ट्रेडर्स या दुकानाजवळून १० जानेवारी रोजी रात्री दहा वाजता लक्ष्मीकांत योगेश राठी यांच्या मालकीची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.आर.११९९) चोरी झाली होती. शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले असता पुणे कारागृहातून एक अट्टल चोरटा बाहेर आला आहे व तो सध्या जळगाव जिल्ह्यात वावरत असल्याची माहिती कॉन्स्टेबल प्रितम पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी गुन्हे पथकाचे सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, सुनील पाटील, दुष्यंत खैरनार, संजय शेलार व अमोल विसपुते यांचे पथक तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. सपकाळे हा शिवाजीनगरात नातेवाईकाकडे आहे व त्याच्याजवळ राठी यांच्या मालकीची दुचाकी असल्याचे समजताच पथकाने पहाटे अडीच वाजता त्याला नातेवाईकाच्या घरी घेरले.

पोलिसांचे मोबाईल चोरले-सपकाळे याच्यावर हडपसर, पुणे येथे दुचाकीचे चोरीचे आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत. तेथील पोलिसांच्या ताब्यात असताना गुन्हे पथकाच्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल व कपाटातील साहित्यही त्याने चोरले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.