शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक फटाका विक्री

By admin | Updated: October 31, 2016 01:24 IST

बाजारपेठेसह गल्लीबोळात अग्निशामक विभाग व पोलिसांचा परवाना न घेता अनेक ठिकाणी फटाका स्टॉल उभारले आहेत.

पिंपरी : शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेसह गल्लीबोळात अग्निशामक विभाग व पोलिसांचा परवाना न घेता अनेक ठिकाणी फटाका स्टॉल उभारले आहेत. नियम, अटींचे पालन न करता अत्यंत धोकादायक पद्धतीने उभारलेले फटाका स्टॉल दुर्घटनेस निमंत्रण देऊ शकतात. औरंगाबाद येथील फटाका दुकांची भीषण आगा आणि भायखळा-मुंबईत येथील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी फटाका विक्रेत्यांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनापरवाना आणि कोणतीही दक्षता न घेतलेले फटाका स्टॉल शहराच्या विविध भागांत आहेत. पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत विनापरवाना फटाका विक्री दुकाने थाटणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे ठरले. महापालिका आणि पोलीस यांच्यामार्फत ही संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय झाला. अशा फटाका विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असली, तरी दिवाळीच्या काही दिवसांच्या कालावधीत सर्वच ठिकाणी पाहणी करणे पोलिसांना शक्य नाही. अनेक ठिकाणचे असे धोकादायक फटाका स्टॉल त्यांच्या नजरेतून सुटू शकतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.वर्दळीच्या ठिकाणी लोकवस्तीत फटाका स्टॉलपिंपरी कॅम्प ही शहराची मध्यवर्ती बाजारपेठ आहे. नेहमीच वर्दळ असलेल्या बाजारपेठेच्या परिसरात अशी दुकाने थाटण्यात आली आहेत. आकुर्डी खंडोबा माळ आणि एचएचे मोकळे मैदान या ठिकाणी पूर्वी फटाका विक्रीच्या स्टॉलच्या रांगा असत.मोकळ्या जागेत अनेक फटाका दुकाने हे चित्र आता दिसून येत नाही, परंतु लोकवस्तीच्या भागात स्टॉल दिसून येत आहेत.फटाका विक्री दुकानासाठी ना हरकत दाखला देताना अग्निशामक विभागातर्फे संबंधित व्यक्तीचे दुकान सुरक्षित ठिकाणी आहे का, याची पाहणी केली जाते. शक्यतो लोकवस्तीच्या बाहेर मोकळ्या पटांगणावर अशी दुकाने थाटण्यास तात्पुरत्या स्वरूपात परवानगी दिली जाते. दुकान हे आरसीसी बांधकाम आणि शटर असलेले असावे, पक्के बांधकाम असलेले दुकान नसेल, तर मोकळ्या जागेत पत्र्यांच्या शेडमध्ये दुकान उभारावे, दुकानामध्ये आग विझविण्याचे उपकरण बसवावे.