शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दारुची बेभाव विक्री!

By admin | Updated: February 9, 2015 00:59 IST

प्रत्येक वस्तूंसह दारूच्या किमती सुद्धा या निश्चित असतात. दारूच्या बॉटलवर एमआरपीसुद्धा असते. परंतु सद्यस्थितीत उपराजधानीतील तब्बल

ग्राहकांची लूट : अबकारी विभाग व पोलिसांची भूमिका संशयास्पद विहंग सालगट/योगेंद्र शंभरकर - नागपूर प्रत्येक वस्तूंसह दारूच्या किमती सुद्धा या निश्चित असतात. दारूच्या बॉटलवर एमआरपीसुद्धा असते. परंतु सद्यस्थितीत उपराजधानीतील तब्बल ९० टक्के दारूच्या दुकानांमध्ये एमआरपीपेक्षा ३० ते ५० रुपये जास्त किमतीवर दारू विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती अबकारी विभाग व पोलिसांनाही आहे. तरीही कारवाई होत नसल्याने त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यात सामान्य ग्राहकांची मात्र लूट सुरू आहे. दारू विक्रेत्यांचा हा मनमानी प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारा कॅमेऱ्यात कैद केला आहे. ९० टक्के दुकानात अधिक किंमतशहरात देशी दारूच्या दुकानांसह ११६ विदेशी दारूची दुकाने आणि १०४ बीअर शॉप आहेत. लोकमतच्या चमूने काही दिवसांपूर्वी शहरातील प्रत्येक क्षेत्रातील दारूच्या दुकानामध्ये आपल्या प्रतिनिधीला ग्राहक बनवून पाठवून दारू विकत घेण्याचा प्रयत्न केला. जवळपास ९० टक्के दुकानदारांनी एमआरपीपेक्षा अधिक किंमत सांगितली. आपच्या प्रतिनिधीने जेव्हा याचे कारण विचारले तेव्हा काही जणांनी उत्तर देण्याचे टाळले तर काहींनी लाभ आणि सेटिंगमध्ये अधिक खर्च होत असल्याची कबुली दिली. एका दुकानदाराने तर सांगितले की, पोलिसांपासून तर अबकारी विभागातील अधिकाऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवावे लागतात. आपल्या खिशातून तर देणार नाही. त्यामुळे ग्राहकांकडूनच वसूल करावे लागतात. गिरीश वॉईन शॉप, जरीपटका जरीपटका मुख्य बाजार परिसरातील गिरीश वाईन शॉपवर जेव्हा आमचे प्रतिनिधीने गेले तेव्हा दोन अल्पवयीन मुलं दारू विकत घेत होती. नियमानुसार अल्पवयीन मुलांना दारू विकता येत नाही. असे असतानाही दोन्ही अल्पवयीन मुले दुकानातून दारूची बॉटल विकत घेऊन गेले. या संपूर्ण घटनेला आमच्या प्रतिनिधीने कॅमेऱ्यात कैद केले. यानंतर १०४ रुपये एमआरपी असलेली ‘रम’ची बॉटल मागितली तेव्हा १२० रुपये मागण्यात आले. याबाबत विचारणा केली असता हीच किंमत असल्याचे सांगण्यात आले. राजेश वाईन शॉप, कमाल चौक कमाल चौकातील राजेश वाईन शॉपर जेव्हा आमच्या प्रतिनिधीने रमची बॉटल मागितली तेव्हा सुद्धा १०४ रुपये एमआरपी नोंदवलेली होती. परंतु दुकानदाराने मात्र ११० रुपये मागितले. दुकानदाराला एमआरपी दाखविली तेव्हा आम्ही ११० रुपयेच घेतो बाकीचे १२० रुपये घेतात. काही दिवसानंतर आम्ही सुद्धा १२० रुपयेच घेऊ, असे उत्तर दिले. मनीष वाईन शॉप वर्धा रोडवर्धा रोडवरील मनीष वाईन शॉपमध्ये आमच्या प्रतिनिधीने ११० रुपये किमतीची रेड रमची बॉटल मागितली असता दुकानदाराने त्याचा भाव १२५ रुपये सांगितला. कारण विचारले असता तोंड फिरवले. घ्यायचे असेल तर घ्या नाही तर नको घ्या, असेही सुनावले. तनवान वाईन्स, नारा रिंग रोड नारा रिंग रोड चौकात तनवान वाईन शॉपवर जेव्हा आमच्या प्रतिनिधीने १८० एमएलची रम मागितली तेव्हा काऊंटरवर बसलेल्या तरुणाने १२० रुपये मागितले. बॉटलवर मात्र १०४ रुपये लिहिले होते. तेव्हा दुकानदाराने सांगितले की, सगळीकडे १२० रुपयेच भाव आहे. मून बीअर शॉप, मनीषनगर येथे आमच्या प्रतिनिधीने १७० रुपयाच्या एमआरपीची बीअर खरेदी करण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने यासाठी २०० रुपये मागितले. अगोदर सांगितले की, चिल्ड करण्यासाठी अधिकची किंमत आहे. नंतर सांगितले की परवाना शुल्क ८५ हजार रुपये होते. आता ते २ लाख १० हजार रुपये झाले आहे. त्यामुळे फारसा लाभ होत नाही. वरून पोलीस आणि अबकारी विभागाचे इन्स्पेक्टर सुद्धा येतात. त्यांनाही काही रक्कम द्यावी लागते.