शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी शेतक-याने काढले स्वत:चे अवयव विक्रीला

By admin | Updated: November 7, 2015 02:59 IST

शेगाव येथे पत्रकार परिषदेत दुष्काळग्रस्त शेतक-याने ठेवला महावितरणवर ठपका.

शेगाव (जि. बुलडाणा): आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी वीज कनेक्शन मिळाले नाही व दुसरीकडे कर्जाची रक्कम बँकेकडून वसूल करण्यास सुरुवात झाल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍याने कर्जमुक्तीसाठी चक्क स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीस काढल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. बँकेकडून कर्ज घेऊन शेतात विहीर खोदली. पाणीही भरपूर लागले. यामुळे बागायत होणार असल्याने आपले दिवस पालटतील, अशी आशा घेऊन बसलेल्या शेगाव तालुक्यातील दिलीप भाऊराव देशमुख या शेतकर्‍याने पत्रकार परिषद आयोजित करून ही घोषणा केली. आपली व्यथा व्यक्त करताना देशमुख यांनीसांगितले, माझी शेगाव तालुक्यातील वरखेड खु. (जि. बुलढाणा) शिवारात शेती असून, शेत बागायती करण्याचे ठरविले. शेतातील ढासळलेली विहीर नव्याने बांधण्यासाठी शेगावच्या कृषी विभागाकडे चकरा मारल्या; मात्र यासाठी कुठलीच योजना नसल्याचे सांगण्यात आले. स्वत: पाच लाख रुपये खर्च करून विहीर उभारण्याचे प्रयत्न केले. तरीही पैसा कमी पडल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेगाव शाखेतून शेत गहाण ठेवून दोन लाख रुपये कर्ज सहा महिन्यांपूर्वी घेतले व विहीर तयार केली. सुदैवाने स्वत:च्या शेतासोबतच आजूबाजूच्या शेतकर्‍यांनाही फायदा होईल असे मुबलक पाणी आहे. ह्य४0 दिवसांत शेतकर्‍यांना वीज कनेक्शनह्ण ही शासनाची घोषणा असताना आठ महिन्यांपासून महावितरण कंपनीच्या शेगाव कार्यालयात चकरा मारत आहे; मात्र आज या, उद्या या याशिवाय कुठलेच उत्तर मिळालेले नाही व रबीचा हंगामही निघून जात आहे. त्यातच बँकेने कर्ज वसुली सुरू केल्याने कर्ज भरण्यासाठी आता शरीरातील एक किडनी, एक डोळा व जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेले अवयव वगळता इतर अवयव विकण्याच्या मानसिकतेत आहे. आपण सदर अवयव आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्ती, जखमी सैनिक, पोलीस यांना दान करण्यासाठी तयार आहोत. कर्जफेड तर करायची आहे; परंतु दुसरं साधन नाही. ऐपतही नाही. त्यामुळं आपल्या अवयवांची विक्री करून कर्जफेड करून घ्या, असं म्हणत या शेतकर्‍याने किडनीसारख्या अन्य अवयवांची विक्री करण्याची परवानगी द्यावी, त्या बदल्यात शासनाने आपल्यावरील कर्ज फेडून घ्यावे, असे आवाहन केले. शेतकर्‍यांना मदत करण्याची आश्‍वासने सरकार देत असली तरी त्यांची अंमलबजावणी महावितरण कंपनी करीत नसल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.