शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दूतावासाच्या नावाखाली केली दारूविक्री

By admin | Updated: January 31, 2016 02:12 IST

परदेशी दूतावासांना उत्पादन शुल्कातून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत, दारूची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी पर्दाफाश केला.

मुंबई : परदेशी दूतावासांना उत्पादन शुल्कातून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत, दारूची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख दोन लाख, महागड्या मद्याच्या ९४ बाटल्यांसह २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कविभागाचे आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.परदेशी दूतावासांना उत्पादन शुल्क माफ असणाऱ्या मद्याची खरेदी करण्याची सवलत दिली जाते. याचाच फायदा घेत, एक टोळी सवलतीतून घेतलेल्या महागड्या दारूची बाजारात विक्री करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय भरारी पथकास समजली. भरारी पथकाचे संचालक डॉ. बी.जी. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत पाचजणांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून ब्लॅकलेबल, ग्लेन फिडीश, डॅलमोर अशा महागड्या मद्याच्या ९४ बाटल्या, २ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. वरळीतील भीमा बिल्डिंगच्या आवारात, वाळकेश्वर येथील अफगाण दूतावासासमोर, तसेच पांडुरंग बुधकर मार्गावर या कारवाया करण्यात आल्याचे सिंघल यांनी सांगितले. या प्रकरणी नारायण कांजी बाभणीया, विजय दूधनाथ यादव, नारायण जिवा पटेल, नितीन तुकाराम गुरव आणि बच्चू नाथा चंदात - पटेल ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. निरीक्षक एम. एस. बिलोलीकर, सुभाष जाधव, दुय्यम निरीक्षक प्रकाश काळे, एस. जी. देवरे, दत्ता शिंदे, सय्यद आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)सापडले धागेदोरेअर्जेंटिनाच्या दूतावासासाठी उत्पादन शुल्कात सवलत असलेली दारूखरेदी करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केला होता. त्यांनी अर्जेंटिना दूतावासाचे पत्रही सादर केले होते, परंतु हे पत्र दूतावासाने दिले नसल्याचे आढळून आले. दूतावासातील काही कर्मचारी सवलतीची दारूखरेदी करून महागड्या दरांत त्याची विक्री करीत असावेत, असा संशय व्यक्त केला जात असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती विजय सिंघल यांनी दिली.