शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पार्कमध्ये रंगले 'सेल्फी'श राजकारण

By admin | Updated: March 3, 2017 01:56 IST

दादारमधील शिवाजी पार्क येथे मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी उभारलेल्या सेल्फी पॉइंटवरून सध्या राजकारण रंगले

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मनसेला पराभूत केल्यानंतरही दादर - शिवाजी पार्कवरून उभय पक्षांतील वाद मिटलेला नाही. यात आता भाजपानेही उडी घेतल्यामुळे येथील सेल्फी पॉइंटवरूनही तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या कल्पनेतून दादर-शिवाजी पार्क येथे मुंबईतील पहिले सेल्फी पॉइंट सुरू झाले. मात्र या प्रभागातून महापालिका निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांचा शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी पराभव केला. त्यानंतर सेल्फी पॉइंटच्या देखभालीसाठी आता कॉर्पाेरेट सामाजिक बांधिलकीतून मिळणारा निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत देशपांडे यांनी हा पॉइंट बंद करण्याची घोषणा मंगळवारी केली.ही संधी साधून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी दादरमध्ये फलकबाजी करत सेल्फी पॉइंट सुरू करणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे भाजपानेही यात रस घेत सेल्फी पॉइंट अधिक आकर्षक करू, असे जाहीर केले. एवढेच नव्हेतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पालिकेच्या सहायक आयुक्तांशी बुधवारी पत्रव्यवहार करून तत्काळ त्यासाठी परवानगीही मिळवली. त्यामुळे मनसेनेही आपला निर्णय मागे घेऊन कोणी यात नाक खुपसू नये, असा सज्जड इशारा शिवसेना- भाजपाला दिला आहे.दरम्यान, हा वाद विकोपाला गेल्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा पॉइंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाध्यक्षांचा आदेश आल्याने अवघ्या काही तासांतच देशपांडे यांनी सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यात देशपांडे यांनी ‘कोणी यात नाक खुपसू नये...’ असा सज्जड इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)>भाजपा सेल्फी पॉइंटवर सेल्फी पॉइंटवरून मनसे आणि भाजपात व्टिटर युद्ध रंगले आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कचा सेल्फी पॉइंट बंद करण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दादर शिवाजी पार्कवरील तरुणाईचे आकर्षण ठरलेला सेल्फी पॉइंट आता भाजपा अधिक आकर्षक पद्धतीने उभारणार.. लवकरच भेटू सेल्फी पॉइंटवर! असे व्टिटरवरून तरुणांना आवाहन केले़>शिवसेनेची फलकबाजीशिवसेनेच्या दादरमधील नवनिर्वाचित नगरसेविका विशाखा राऊत यांनीही शिवाजी पार्कच्या सेल्फी पॉइंटची जबाबदारी यापुढे शिवसेना स्वीकारत आहे. लवकरच आम्ही नवीन कल्पकता असलेला सेल्फी पॉइंट आपणास देऊ! अशा आशयाचे होर्डिंग शिवाजी पार्क येथे लावून मनसेला डिवचले आहे.