शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीची हौस फिटेना

By admin | Updated: January 11, 2016 03:30 IST

सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडालेल्या कॉलेज तरुणीसह तिला वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेतलेल्या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही.

मनीषा म्हात्रे , मुंबई सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडालेल्या कॉलेज तरुणीसह तिला वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेतलेल्या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही. या दोन्ही कुटुंबीयांवर शोककळा पसरली असताना बॅण्डस्टँडवर मात्र सेल्फीची क्रेझ कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पोलिसांसह, अग्निशमन दल, तटरक्षक दलाने तरुणीसह तिला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा शोध थांबवल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेतवांद्रे येथील बॅण्डस्टँड येथे शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या तरन्नुम अन्सारी, अंजुम खान आणि मुश्तरी खान या तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडाल्या. रमेश वळुंज या तरुणाने जिवाची पर्वा न करता अंजुम आणि मुश्तरीचे प्राण वाचवले. समुद्रात गेलेल्या तरुन्नुमला वाचविण्याच्या प्रयत्नात तो तिच्यासह लाटेच्या प्रवाहात दिसेनासा झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, तटरक्षक दलाकडून जोमाने शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र त्या तुलनेत रविवारी हे शोधकार्य मंदावल्याचा आरोप वळुंज कुटुंबियांनी केला. वांद्रे किल्ल्याच्या तटबंदीपर्यंतचा मार्ग बंद करण्यात आला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या एका घिरटीनंतर येथे कोणी फिरकले नाही. स्थानिक पोलीस ठाण्याची एक व्हॅन फक्त देखरेखीसाठी ठेवण्यात आल्याने आम्ही आमच्या बोटी घेऊन त्यांचा शोध घेत असल्याचे रमेशचे मामा सुरेश सावंत यांनी सांगितले.एकीकडे दोघांच्या मृतदेहाचा पत्ता लागला नसताना शोधकार्य थंडावले होते. तर सेल्फीच्या नादात दोन जीव गेल्यानंतरही सेल्फीची ‘क्रेझ’ येथे दिसून आली. रविवार मेगाब्लॉक असताना देखील तरुणाई मोठ्या संख्येने बँडस्टँडच्या समुद्रकिनाऱ्यावर तळ ठोकून होती. पाण्यात उभे राहून सेल्फी काढले जात होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती होती. तर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओहोटी होती. तरिही एकमेकांना ढकलून मौजमस्ती देखील आज दिसून आली. विशेष म्हणजे अवघ्या काही तासांपूर्वी सेल्फीच्या नादातूनच जीव गेल्याची थोडीही फिकीर आज परिसरात जाणवली नाही. मॉरल पोलिसिंगच्या नावाखाली पोलिसांवर झालेल्या कारवाईनंतर येथील जमावाला हटविणे पोलिसांसमोर आता आव्हान बनले आहे. कारवाई केली तरी टीका नाही केली तरी टीका असे दोन्ही बाजूने पोलीस भरडले जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घटनेनंतर या ठिकाणी सतर्कता म्हणून पोलीस लक्ष ठेवून असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वळुंज कुटुंबियांना मदतीची हमीरमेश वळुंजच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांचा आधार गेला आहे. रविवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी वळुंज कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांनी रमेशच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च तसेच पत्नीला नोकरी मिळवून देण्याची हमी यावेळी दिली. शासनाने रमेशच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळवून द्यावी, अशी मागणी रमेशचे मामा सुरेश सावंत यांनी केली.