शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सेल्फी’ काढणे बेतले जिवावर !

By admin | Updated: January 10, 2016 04:44 IST

सेल्फी काढण्याच्या नादात तीन तरुणी समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे घडली. या दुर्घटनेत बचावासाठी पुढे सरसावलेल्या तरुणाने दोघींना वाचवले; मात्र तिसऱ्या

मुंबई : सेल्फी काढण्याच्या नादात तीन तरुणी समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे घडली. या दुर्घटनेत बचावासाठी पुढे सरसावलेल्या तरुणाने दोघींना वाचवले; मात्र तिसऱ्या तरुणीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तोही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत या दोघांचाही थांगपत्ता लागला नाही.गोवंडी बैंगनवाडी येथील रहिवासी तरन्नुम अन्सारी (१८), अंजुम खान (१७) आणि मुश्तरी खान (१८) या तीन मैत्रिणी शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रकिनारी फिरायला गेल्या होत्या. ओहोटी असल्याने त्या समुद्रात बऱ्याच आतपर्यंत गेल्या. तेथे सेल्फी काढण्याच्या नादात पाण्याची पातळी वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. अचानक अंजुमचा पाय घसरला आणि तिला पकडण्याच्या नादात तरन्नुम आणि मुश्तरी या तिघीही खाली पडल्या आणि बुडू लागल्या. त्यांना वाचविण्यासाठी रमेश वळुंज (३५) याने समुद्रात उडी घेतली. सुरुवातीला मुश्तरी आणि अंजुमला बाहेर काढून, प्रवाहाच्या ओघात वाहत चाललेल्या तरन्नुमच्या बचावासाठी तो पुढे सरसावला. बचावासाठी तरन्नुमने त्याला घट्ट धरून ठेवल्याने दोघेही भरतीच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान, तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने सकाळी ११ वाजल्यापासून दोघांनाही शोधण्याचे काम सुरू झाले. मात्र रात्री उशिरापर्यंत एकाचाही थांगपत्ता लागला नाही. (प्रतिनिधी)अद्याप शोध सुरूचशनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून दोघांनाही शोधण्याचे काम सुरू झाले. मात्र रात्री उशिरापर्यंत एकाचाही थांगपत्ता लागला नाही.