शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

स्वाभिमानी संघटना तोंडघशी

By admin | Updated: September 25, 2014 01:14 IST

लढण्यापूर्वीच झटका : शिवसेना-भाजप युतीलाही बसणार फटका

विश्वास पाटील - कोल्हापूर -महायुतीत शिवसेना-भाजप या प्रमुख पक्षांनीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतरही घटकपक्षांना पुरेशा जागा न दिल्याने हे घटकपक्ष महायुतीतून बाहेर पडले. त्यामुळे संघटनेला चांगलाच झटका बसला असून, या घडामोडींमध्ये संघटना तोंडघशी पडल्याचे चित्र पुढे आले आहे. महायुती आकारास यावी यासाठी ज्यांचे योगदान राहिले, त्यांनाच घराबाहेर पडण्याची वेळ आल्याचा अनुभव यानिमित्ताने खासदार राजू शेट्टी यांना आला आहे. ‘स्वाभिमानी’सह राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पक्ष (आठवले) गट यांच्या दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय ताकदीचा विचार केल्यास किमान २१ जागांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणजे या ठिकाणच्या लढती महायुतीला जड जाऊ शकतात.जरी आज, बुधवारी सायंकाळपर्यंत झालेल्या घडामोडींनुसार स्वाभिमानी संघटना महायुतीतून बाहेर पडली असली तरी अजूनही समझोता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या सगळ्या पक्षांनी एकत्र यावे, असा जनतेचाच त्यांच्यावर दबाव आहे. ‘स्वाभिमानी’ महायुतीतून बाहेर पडल्यास त्याचा त्यांना जसा फटका बसणार आहे, तसा तो शिवसेना-भाजपलाही नक्कीच बसणार आहे. शिवसेना व भाजपची राज्यात १९९० पासून युती होती. युतीला महायुती करण्यात या तीन पक्षांचे पाठबळ नक्कीच महत्त्वाचे होते. युतीचा पाया ग्रामीण महाराष्ट्रात विस्तारण्याचे काम इतर तीन पक्षांमुळे होणार होते, हे ध्यानात आल्यानेच स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी शेट्टी, महादेव जानकर व रामदास आठवले यांना बरोबरीने घेतले. त्याचा लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलाच फायदा झाला. मुंडे यांच्यामुळेच ही युती आकारली. त्यामुळे ते असेपर्यंत घटक पक्षांत चांगला समन्वय होता. परंतु, त्यांचे निधन झाले व लोकसभेला मोदी लाटेमुळे दणदणीत विजय मिळाल्यावर दोन प्रमुख पक्षांना घटकपक्षांची गरज वाटेनाशी झाली. आताही घटकपक्षांना जास्त जागा द्यायला लागू नयेत, असाच कावा होता हे स्पष्ट होत आहे.या घडामोडींत शेट्टी यांची जास्त पंचाईत झाली. कारण मुळातच ते जेव्हा भाजपच्या आघाडीत सहभागी झाले, तेव्हा त्यांच्यावर चोहोबाजूंनी कडाडून टीका झाली. शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी हे भाजपमध्ये गेल्यावर स्वतंत्र संघटना काढणारे पुन्हा त्याच वाटेने गेल्याची टीका झाली; परंतु शेट्टी यांनी व्यक्तिगत करिष्म्याने त्यावर मात केली. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल या भावनेने त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. महायुती व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील राहिले; परंतु झाले उलटेच. संघटनेची आतापर्यंतची सगळी वाटचाल स्वबळावर झाली आहे हे खरे असले तरी शेट्टी खासदार झाल्यानंतर संघटनेला दक्षिण महाराष्ट्रात एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. आता कार्यकर्त्यांना आमदारकीचा गुलाल देण्याची संधी आली असताना महायुतीतून अपमानास्पदरीत्या बाहेर पडावे लागणार असल्याने संघटनेलाही त्याचा फटका बसणार आहे.‘स्वाभिमानी’सह तिन्ही प्रमुख घटकपक्ष स्वबळावर अपवाद वगळता एकही जागा निवडून आणू शकत नाहीत हे वास्तव असले तरी, ते युतीच्या उमेदवारांचा नक्कीच पराभव करू शकतात. गत निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेने या चार जिल्ह्यांत १४ जागा लढविल्या. त्यांच्या उमेदवारांना सरासरी १४ टक्के मते मिळाली आहेत, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील एकूण जागा --37