मुंबई : पशुसंवर्धन विभागातील निलंबित सहाय्यक आयुक्त तानाजी खांडेकर यांनी आज दुपारी सह्णाद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.खांडेकर यांनी अचानक बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेतले आणि आपल्यावर अन्याय झाल्याचे जोरजोराने ओरडून सांगू लागले. सह्णाद्रीच्या गेटवर तैनात असलेले पोलीस तत्काळ धावले आणि त्यांनी खांडेकर यांना ताब्यात घेतले असून त्यांना मलबार हिल पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.गुरेवाटप प्रकरणात २० लाख रुपयांच्या अपहाराबद्दल खांडेकर यांना निलंबित करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्णाच्या सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे खांडेकर कार्यरत असताना हा प्रकार घडला होता. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात ते निर्दोष आढळले तर निलंबन मागे घेतले जाईल. याबाबत खांडेकर यांच्या पत्नी म्हणाल्या, काही कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी संगनमत करून आपल्या पतीला फसविले आहे. (विशेष प्रतिनिधी)
पशुसंवर्धन अधिका-याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: September 10, 2014 03:13 IST