शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांना राज्यभरात अभिवादन

By admin | Updated: July 3, 2017 04:42 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची ९४वी जयंती रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची ९४वी जयंती रविवारी राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विदर्भात स्मृती जागविल्याविदर्भातील नागपूरमध्ये ‘लोकमत’ आणि ‘डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनंट सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. या वेळी रक्तदात्यांना रक्तदान कार्ड, प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. अमरावतीत  लोकमत  व संत गाडगेबाबा रक्तपेढी ंअ‍ॅण्ड कम्पोनंट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. तर भंडाऱ्यात लोकमत व लाईफलाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान झाले. चंद्रपूरात अनेकांनी रक्तदान करून बाबुजींना आदरांजली वाहिली. गडचिरोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोंदियात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. वर्धा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान करून बाबुजींना आदरांजली अर्पण केली.अकोल्यात आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांसह लोकमत परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. लोकमत व डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुलडाणा तसेच वाशिम येथील लोकमत कार्यालयांत श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. वाशिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मराठवाड्यात भावांजलीमराठवाड्यात औरंगाबाद येथे लोकमत व लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. लातूर येथे डॉ़भालचंद्र ब्लड बँकेत आयोजित रक्तदान शिबिरात लोकमत परिवारातील सदस्यांसह २५ जणांनी रक्तदान केले़ नांदेड येथे किड्स किंगडम पब्लिक स्कुल येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या प्रारंभी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ जालना, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि बीड येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.खान्देशात उत्स्फूर्त रक्तदानजळगावात लोकमत व इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर झाले. यात २४ जणांनी रक्तदान केले. तर, अहमदनगर येथे लोकमत आणि आनंदऋषिजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात २० जणांनी रक्तदान केले. नाशिकमध्ये लोकमत आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली व स्व. जवाहरलालबाबूजींना आदरांजली अर्पण करण्यात आली.कोकणातही रक्तदानरत्नागिरीत ‘लोकमत’ परिवार व लायनेस क्लब, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’ कर्मचाऱ्यांसह शहरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान केले. पनवेलमध्ये लोकमत आणि रोटरी क्लब आॅफ न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सोलापुरात मान्यवरांकडून स्मरणसोलापूरमध्ये ‘लोकमत’ आणि गोपाबाई दमाणी ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक व अश्विनी ग्रामीण रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत भवन’मध्ये रक्तदान शिबीर झाले. या निमित्त झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. जवाहरलालबाबूजींच्या आठवणी जागवून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.