शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

‘महाराष्ट्रीयन्स’ची निवड सोपी नव्हती!

By admin | Updated: April 6, 2016 05:12 IST

ज्या महनीय व्यक्तींनी देश आणि राज्य घडविण्यात महत्त्वाचे योगदान दिले, अशा सर्व महाराष्ट्रीयन्सना शोधण्याचे कार्य ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’च्या माध्यमातून झाले असल्याने

मुंबई : ज्या महनीय व्यक्तींनी देश आणि राज्य घडविण्यात महत्त्वाचे योगदान दिले, अशा सर्व महाराष्ट्रीयन्सना शोधण्याचे कार्य ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’च्या माध्यमातून झाले असल्याने, याचा आपल्याला मनापासून आनंद होत असल्याची भावना ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. मुंबईतील एनसीपीएच्या भव्य सभागृहात पार पडलेल्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’ सोहळ्याचे प्रास्ताविक खा. दर्डा यांनी केले. ‘लोकमत’ची सामाजिक बांधिलकी, पुरस्कारासाठी नामांकितांची निवड आणि पारदर्शी निवड प्रक्रियेची विस्तृत माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘ही निवड एवढी सहज सोपी नव्हती. या पुरस्कारांची ही तिसरी एडिशन आहे. पहिल्या एडिशनमध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला, ते आमीर खान इथे उपस्थित आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ज्यांना नॉमिनेशन्स मिळाले, ते सर्व आमच्यासाठी विजयी आहेत. आम्हाला या सर्वांच्या कार्याविषयी मनापासून आदर आहे, अभिमान आहे.’ ‘जगभरातील लाखो वाचकांनी ईमेल्सच्या माध्यमातून, तसेच ज्युरी मेंबर्सनी अचूक, सखोल, विस्तृत चर्चा केल्यानंतर, या मानकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणारे हिरे, मोती, रत्न आणि प्रसिद्धीपासून दूर राहून वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी ही सर्व मंडळी आदरणीय अशीच आहेत. गेल्या पुरस्काराच्या वेळी विदर्भाचे लाडके सुपुत्र देवेंद्रजी फडणवीस यांचे नॉमिनेशन झाले होते. पुढे ते मुख्यमंत्री झाले. यातून आमची निवड किती अचूक होती, हेच सिद्ध होते. यंदाचे नॉमिनी नितीन गडकरीजी हेसुद्धा आमच्या पुरस्कारांच्या पहिल्या एडिशनमध्ये नॉमिनी होते. आज ते केंद्र सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाच्या खात्यात कार्यरत आहेत.’ ‘आपल्या कार्याने ते देशावर छाप उमटवत आहेत, पण एका गोष्टीची खंत वाटते. ती म्हणजे, आमचे एका वर्षीचे नॉमिनी जे पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, ते आर. आर. पाटील आज आमच्यात नाहीत, त्यांची आठवण आज प्रकर्षाने होत आहे,’ अशी भावना खा. दर्डा यांनी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)