शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र व्यक्तीची लाभार्थी म्हणून निवड

By admin | Updated: June 5, 2017 01:03 IST

अपंग लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेने यशवंत निवारा ही योजना सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अपंग लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेने यशवंत निवारा ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील अपंगांना व्हावा हा हेतू आहे. परंतु, जेजुरी नगरपालिका हद्दीतील अपंग व्यक्तीची घरकुलासाठी निवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी अर्जांच्या छाननीकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. आई-वडिलांच्या मागे अपंगांचा सांभाळ केला जात नाही. अनेकदा त्यांना घरातून बाहेर काढण्यात येते. त्यामुळे त्यांचे जगणे अवघड होते. रस्त्याच्या कडेला, मंदिरामध्ये, अनाथालयांमध्ये त्यांना आसरा घ्यावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने अपंग व्यक्तीचे सक्षमीकरण व्हावे, बेघरांना निवारा मिळावा यासाठी यशवंत निवारा योजनेंतर्गत बेघर अपंगांना घरकुल देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेने योजनेसाठी २०१६-१७ साठी ४ कोटी २४ लाखांची तरतूद केली आहे. अपंगांना घरकुलासाठी १ लाख रुपये उपलब्ध करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातून १ हजार ३१६ प्रस्ताव आले होते. छाननी करून ४२३ लाभार्थ्यांची निवड केली असून, लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील निधी जिल्हा परिषदेने दिला आहे. लाभार्थ्यांच्या यादीची तपासणी केल्यानंतर जेजुरी नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या एका अपंग व्यक्तीचा यादीमध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. या अपंग व्यक्तीने जेजुरी नगरपालिकेकडून सहा हजारांचा लाभ घेतला आहे. पुंरदर तालुक्यातून घरकुलासाठी याच व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला नाही अशा व्यक्तीची या योजनेमध्ये निवड कशी झाली, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. अपंग घरकुल योजनेमध्ये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने घोटाळा केला आहे. अपात्र अपंगांना घरकुल योजनेतून लाभ दिला आहे. यामुळे खरा अपंग घरकुल लाभापासून वंचित राहिला आहे. प्रहार अपंग क्रांतीने या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी तपासली. यामुळे हा घोटाळा समोर आला आहे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीची पुन्हा तपासणी करून कारवाई करण्यात यावी.- सुरेखा ढवळे, प्रहार अपंग क्रांती संघटनाअपंग घरकुल योजनेसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांची यादी आली आहे. जेजुरीमधील एका अपात्र लाभार्थ्याची घरकुल योजनेसाठी निवड केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तपासणी केली जाईल. अपात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी दिला जाणार नाही. तसेच या प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. सर्व लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करणार आहे. - प्रवीण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद