शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सोलापूरात कृष्णा खोरेच्या कार्यालयाची जप्ती

By admin | Updated: October 20, 2016 04:54 IST

न्यायालयाच्या आदेशान्वये भीमा कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांच्या कार्यालयातील फर्निचर जप्त करण्यात आले़

सोलापूर : ठेकेदाराची थकबाकी न दिल्याने सोलापूरातील कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या भीमा कालवा मंडळाच्या कार्यालयावर बुधवारी जप्तीची नामुष्की ओढावली़ न्यायालयाच्या आदेशान्वये भीमा कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांच्या कार्यालयातील फर्निचर जप्त करण्यात आले़सोलापूरातील भारत कन्स्ट्रक्शनने जाहीर निविदाद्वारे कृष्णा खोरे विकास महामंडळाची विविध कामे केली होती. परंतु अनेकदा मागणी केल्यानंतरही बिले मिळाली नाहीत़ अखेर भारत कन्स्ट्रक्शनने जिल्हा न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने भारत कन्स्ट्रक्शनच्याबाजूने निर्णय देताना बिलापोटीच्या रकमेसाठी जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला़ या आदेशाला आव्हान देत कृष्णा खोरे विकास महामंडळाने उच्च न्यायालयात अपिल केले होते़ मात्र उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवत तातडीने थकबाकी अदा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी भारत कन्स्ट्रक्शनचे नंदकिशोर शहा, उपाध्यक्ष विजयसिंह बायस, रोखपाल स्वामिनाथ कोकणे हे न्यायालयाच्या बेलिफ आर.एम. तांडुरे, अशोक ससाणे यांना घेऊन भीमा कालवा मंडळाच्या कार्यालयात गेले. थकीत ८ कोटी ७५ लाखांपैकी न्यायालयाच्या आदेशानुसार किमान १० लाख रुपये द्यावेत, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल असे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांना सांगितले. हे प्रकरण न्यायालयात आहे अन् लगेच पैसे देणेही शक्य नसल्याचे कांबळे यांनी सांगितल्यानंतर अधीक्षक अभियंत्याच्या खुर्चीसह अन्य १० खुर्च्या, एक टेबल व दोन संगणक जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)>शासनाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. अपिल सुरू असतानाच जप्तीची कारवाई झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.- राजकुमार कांबळे, अधीक्षक अभियंता भीमा कालवा>५२ लाखांचे साडेबारा कोटी झालेउजनीच्या उजव्या कालव्याची खोदाई व भराव्याचे काम भारत कन्स्ट्रक्शनने घेतले होते. १९९५-९६ सालच्या कामाचे बिल ते मागत होते. पैसे मिळत नसल्याने त्यांनी बसून राहिलेल्या मशिनरी व अन्य बाबीवर झालेल्या खर्चापोटी साडेबारा कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. लाखाच्या कामाच्या बिलाबाबत तत्कालीन अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने खुर्ची जप्त होण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली.>कंत्राटदारांची बिले न दिल्याने सोलापूरातील ‘सिंचन भवन ’ येथील कृष्णा खोरे विकास मंडळाच्या कार्यालयावर बुधवारी जप्तीची कारवाई झाली़ अधिक्षक अभियंतांच्या डोळ्यादेखत त्यांची खुर्ची नेण्यात आली़