शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एसआरएच्या ‘त्या’ घरांवर जप्तीचे संकट

By admin | Updated: January 10, 2017 04:29 IST

मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गतची (एसआरए) जी घरे दहा वर्षे पूर्ण होण्याआधीच विकण्यात आली त्यांना हस्तांतर शुल्क घेऊन

मुंबई : मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गतची (एसआरए) जी घरे दहा वर्षे पूर्ण होण्याआधीच विकण्यात आली त्यांना हस्तांतर शुल्क घेऊन नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत होऊ शकला नाही. त्यामुळे अशा ६३ हजार घरांवर जप्तीचे संकट कायम आहे. ही घरे ताबा मिळाल्यापासून दहा वर्षांच्या आत विकता येणार नाहीत, अशी एसआरएची अट असताना हजारो घरे विकण्यात आली. अशी घरे जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तथापि, ही घरे हस्तांतरण शुल्क आकारुन नियमित करावीत, अशी भूमिका मुंबई भाजपाने घेतली होती. तथापि, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ न करता राज्य सरकारने उपसमितीची मात्रा शोधली आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की असा निर्णय घेतला तर तो न्यायालयाचा अवमान असेल असे स्पष्ट मत विधी व न्याय विभागाने तसेच गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निदर्शनास आणून दिले. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही घरे जप्त करुन रोष ओढावणे राज्य सरकारला राजकीयदृष्ट्या नक्कीच परवडणारे नसल्याने आता मंत्रिमंडळ उपसमितीची मात्रा काढण्यात आली आहे. उद्या, राज्य सरकारने ही घरे हस्तांतरण शुल्क आकारून नियमित करण्याची भूमिका घेतली तर ती न्यायालयात टिकेल का हा प्रश्न आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी पत्रकारांना सांगितले की ज्यांनी घरे विकत घेतली त्यांच्याकडून हस्तांतरण शुल्क घेऊन ती नियमित करण्याबाकबत उपसमिती विचार करेल. संक्र मण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरुंना आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन सदनिका देण्यासह अशा शिबिरातील अनिधकृत रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेतून सदनिका देण्यासंदर्भात धोरण ठरविण्याचे काम उपसमिती करेल. स्वत: मेहता हे या समितीचे अध्यक्ष असतील. त्यात शिक्षण मंत्री विनोद तावडे व परिवहन दिवाकर रावते यांच्यासह राज्यमंत्री रविंद्र वायकर, श्रीमती विद्या ठाकूर आणि रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. समन्वयक म्हणून गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव काम पाहणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)