शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
3
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
4
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
5
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
6
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
7
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
8
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
9
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
10
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
11
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
12
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
13
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
14
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
15
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
16
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
17
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
18
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
19
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
20
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा

‘एचडीआयएल’ची पाच हजार कोटींची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:01 IST

पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई । देशासह परदेशातील व्यवहारांची पडताळणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्टÑ सहकारी बॅँकेच्या (पीएमसी) हजारो खातेदारांना अडचणीत आणण्यात कारणीभूत ठरलेल्या हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीवर (एचडीआयएल) सक्त वसुली संचालनालयाने कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या आठवड्याभरात कंपनीची ५ हजार कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. कंपनीच्या देशभरातील मालमत्ता येत्या काही दिवसांत सील केल्या जातील. तसेच त्यांच्या देश-विदेशातील व्यवहाराची पडताळणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दिवाळखोरीत आलेल्या एचडीआयएल कंपनीचा कार्यकारी संचालक राकेश वाधवा व त्याचा मुलगा सारंग उर्फ सन्नी वाधवा यांना ३ आॅक्टोबरला अटक केली आहे. त्यांच्या कोठडीची मुदत १४ आॅक्टोबरपर्यंत आहे. वाधवा याच्या मालकीचे वसईतील दिवाण फार्म हाउस शुक्रवारी जप्त केले आहे. सुमारे पाच एकर परिसराच्या या विस्तीर्ण बंगल्यात तलावासह २२ मोठ्या खोल्या आहेत. शिवाय विरार, पालघर येथील बंगले व ४०० एकर भूखंड ताब्यात घेतले आहेत. तसेच वाधवा कुटुंबीयांच्या मालकीची दोन खासगी विमाने, जहाज तसेच रॉयल्स, मर्सिडिज बेंझ, बेटली, टोयोटा इनोव्हेशन अशा सुमारे ११२ आलिशान मोटारी जप्त केल्या आहेत. वाधवाच्या बंगल्यातून लाखोची रोकड व दागिनेही जप्त केले. दागिन्यांची किमत शेकडो कोटींच्या घरात असल्याचे समजते.पीएमसी बॅँकेकडून ‘एचडीआयएल’ने घेतलेल्या साडेतीन हजार कोटींच्या कर्जाची परतफेड केली नाही. बॅँकेचे तत्कालीन अध्यक्ष वरम सिंग व अन्य संचालक आणि बॅँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमतातून ही कर्जे मंजूर केल्याचे तपासातून पुढे आले आहे. बॅँकेने २१ हजार बनावट खाती बनवून त्यातून हजारो कोटींची बेनामी कर्जे उचलली. बॅँकेच्या घोटाळ्यात प्रामुख्याने एचडीआयएलच्या मोठा वाटा आहे. वाधवाने घेतलेली रक्कम अन्य व्यवहार व परदेशात गुंतविल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने १० दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मुंबई ईडीने ‘मनी लॉण्ड्रिंग’अंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.एचडीआयएलच्या परदेशातील व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. वाधवा कुटुंबीय व कंपनीचे सर्व व्यवहार सील केले आहेत. वाधवाच्या मुंबईव्यतिरिक्त देशातील अन्य ठिकाणच्या मालमत्तांवर बडगा उगारला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँक