शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वेतन करारावर शिक्कामोर्तब, दीड लाख कर्मचा-यांना लाभ

By admin | Updated: June 22, 2016 18:35 IST

साखर कारखान्यांमधील कर्मचा-यांच्या नव्या वेतन कराराला बुधवारी मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी घेण्यात आला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - राज्यातील साखर कारखान्यांमधील कर्मचा-यांच्या नव्या वेतन कराराला बुधवारी मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी घेण्यात आला. नव्या करारानुसार साखर कर्मचा-यांच्या वेतनात पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे. या करारामुळे सुमारे दीड लाख साखर कर्मचा-यांना वेतनवाढीचा फायदा मिळणार आहे. माजी केंद्रीय कृत्रीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वेतन कराराबाबत नेमण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे आदींच्या उपस्थितीत नव्या वेतन करारावर शिक्कामोर्तब झाले. राज्यात दोनशेच्या वर सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये सुमारे दीड लाख कर्मचारी असून दर पाच वर्षांनी या कर्मचा-यांचा वेतन करार होत असतो. जुना वेतन करार १ एप्रिल २०१४ रोजी संपला. मात्र त्यानंतर नवा करार अस्तित्वात आला नव्हता. नवा वेतन करार करण्यासाठी शिवाजीराव गिरधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जुलै २०१५ मध्ये एक त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीत साखर कारखान्यांच्या आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. कर्मचा-यांच्या वेतनवाढीसंदर्भात समितीच्या अनेक बैठका झाल्या मात्र नव्या वेतन कराराबाबत अंतिम निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी साखर कर्मचा-यांच्या वेतनात पंधरा टक्के वाढ करण्यावर एकमत झाले. नव्या वेतन कराराला कर्मचारी प्रतिनिधींनीही मान्यता दिली आहे. त्यानुसार मूळ वेतन, रहिवास आणि महागाई भत्ता मिळून होणा-या एकूण वेतनाच्या पंधरा टक्के वाढ दिली जाणार आहे. तसेच या कराराची त्रिपक्ष समिती नियुक्त झाल्यापासून म्हणजेच जुलै २०१५ पासून अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जुलै २०१५ पासूनच्या वेतनातील फरकही कर्मचा-यांना मिळणार आहे. नवा वेतन करार एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१९ या पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. यावेळी झालेल्या बैठकीला राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, श्रीराम शेट्ये, आमदार बबनदादा शिंदे, तात्यासाहेब काळे, अविनाश काका आपटे, राहू पाटील, शंकरराव भोसले आदी उपस्थित होते.