शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सातबारे तपासा, किती शेतकरी मंत्री आहेत हे कळेल!

By admin | Updated: June 8, 2017 06:28 IST

भाजपाच्या मंत्रिमंडळात शेतकरी किती आहेत, असे निरर्थक सवाल करणाऱ्यांनी भाजपाच्या मंत्र्यांचे सातबारे तपासून पहावेत

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपाच्या मंत्रिमंडळात शेतकरी किती आहेत, असे निरर्थक सवाल करणाऱ्यांनी भाजपाच्या मंत्र्यांचे सातबारे तपासून पहावेत, म्हणजे त्यांना खरे काय ते कळेल, असा जोरदार हल्ला कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी चढवला. भाजपा सरकारचे मंत्री शेतकरी आहेत का? असा प्रश्न शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला होता. त्याला फुंडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.सरकार शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे व त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आहे हे पाहून विरोधकांनी यात राजकारण आणणे सुरू केले आहे. वस्तुत: त्यांना शेतकऱ्यांना काही मिळूच द्यायचे नाही, असा टोलाही फुंडकर यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसला लगावला. दोन्ही काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना पुढे करून राजकारण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.खा. राजू शेट्टींचे वर्चस्व कमी करण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुढे करत मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. खोत यांना शेतकरी संघटनेतून काढून टाकण्यासाठी खा. शेट्टी यांच्यावर दबाव आणणे सुरू केल्याचे संघटनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेलाही या निर्णयापासून दूर ठेवले. आता संपाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, असे शेतकऱ्यांनी जाहीर केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीने देऊ केलेल्या कथित पाठिंब्याची हवाच निघून गेली आहे.>भाज्यांची आवक सुरळीतगेल्या काही दिवसांपासून घटलेली भाज्यांची आवक सुरळीत होत आहे. पुणे, नवी मुंबईसह नाशिकच्या बाजार समितीमध्ये बुधवारी भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने भाज्यांचे भावही कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तीन ते चार दिवसांपासून अनेक भाज्यांनी शंभरी गाठली होती. मात्र आता तेच दर झपाट्याने कमी होत आहेत.शेतकरी संपाबद्दल अभिनेता मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी बुधवारी या विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यासाठी मैदानात उतरावे लागू नये. तशी वेळ त्यांच्यावर येणे हे दुर्दैवाचे आहे, असे यावेळी नाना पाटेकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जेवढे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात येईल तेवढा हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता नाना यांनी व्यक्त केली. मकरंद अनासपुरे म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यायला हवे, त्यांनी शेतकऱ्यांचा फुटबॉल करू नये, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, अशी मागणी करतानाच, आम्हाला पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार नको पण शेतकऱ्यांसाठी जे करता येईल ते करा, असे भावनिक आवाहनही मकरंदने केले.