शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

काम पाहूनच उमेदवारी

By admin | Updated: July 18, 2014 02:41 IST

भाजपाच्या विद्यमान आमदारांची कामगिरी (परफॉर्मन्स) पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.

औरंगाबाद : भाजपाच्या विद्यमान आमदारांची कामगिरी (परफॉर्मन्स) पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. पक्षाला ‘अच्छे दिन’ येताच इच्छुकांची उमेदवारी मागण्यासाठी भरती आल्यामुळे ती स्पर्धा रोखण्यासाठी पक्षाने (केआरए) ‘की रिझल्ट एरिया’चे निकष लावून परफॉर्मन्स तपासणीचा निर्णय घेतला आहे, असे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजपाच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी औरंगाबाद येथे पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आ.फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आहे. महायुती अभेद्य राहणार आहे. महायुतीमध्ये आता कोणताही नवीन पक्ष येणार नाही. १५ ते २० आॅगस्टदरम्यान भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर होईल, असे आ. फडणवीस म्हणाले. धर्माच्या नावावर आरक्षण नकोमुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणावर भाजपाने का आक्षेप घेतला आहे, यावर आ.फडणवीस म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर ते आरक्षण दिले आहे. धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही. आरक्षणाला विरोध नसून शासनाने जी प्रक्रिया राबविली, त्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेला विनंतीमहायुतीच्या बाबतीत किंवा एकमेकांच्या पक्षाबाबत उलटसुलट वक्तव्ये करू नयेत. आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनाही तसेच सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे बोलतील तेच अधिकृत मानले जाईल, असे आ.फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारचे निर्णय बदलू निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घाई घाईने जे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे ते सर्व निर्णय महायुतीचे सरकार येताच बदलून टाकू. विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी सरकार हे निर्णय घेत असल्याचा आरोप आ.फडणवीस यांनी केला. (प्रतिनिधी)