शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण

By admin | Updated: July 1, 2016 02:59 IST

शुक्रवार १ जुलै या कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे

अलिबाग : शुक्रवार १ जुलै या कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे. याच दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने अत्यंत आगळ््यावेगळ््या ‘गोवा राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा बीजारोपण मोहिमेचे’ आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आयोजित या मोहिमेत पाली येथील पालीवाला कॉलेजचे विद्यार्थी उपप्राचार्य प्रा.सुधीर पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली १००० बियांचे रोपण करणार आहेत, तर पोलादपूर येथील एस.एम.कॉलेजचे विद्यार्थी पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावर बीजारोपण करण्याकरिता बिया वाटप करणार असल्याची माहिती शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांनी दिली आहे.विसावा (महाड) येथे १० हजार बियांची उपलब्धता सफर केंद्र व सावली गोशाळेचे संचालक गणराज जैन व अ‍ॅड.अर्चना जैन यांनी केली आहे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबागचे प्रमुख आल्हाद पाटील यांनी तितक्याच बियांची उपलब्धता ठेवली आहे.बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी आठ वाजता विसावा (महाड) येथे महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले व शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पळस्पे (पनवेल) येथे माजी आमदार विवेक पाटील व व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन,खिडकी-अलिबागचे प्रमुख आल्हाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच वेळी होणार आहे.विसावा (महाड) येथील उपक्रमाकरिता सफर केंद्र आणि सावली गोशाला, आसनपोई-महाड आणि शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाड या दोन संस्थांचे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबाग व भारत पेट्रोलियम वैभव आॅटोमोबाईल्स, पळस्पे-पनवेल या दोन संस्थांचे सहकार्य लाभले आहे.>बियांची नैसर्गिक रुजवात ८० टक्केबीजारोपण ही वृक्ष आणि वन संवर्धनाकरीता अत्यंत शास्त्रशुद्ध आणि प्रभावी प्रक्रीया आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून ही गोवा राष्ट्रीय माहामार्गाच्या दूतर्फा आगळी मोहीम हाती घेण्यात आल्याचे कळल्यावर खरच आनंद वाटला. हि मोहीम वैशिष्ठ्यपूर्ण आहे. बीया एके ठिकाणी रुजवून त्याची लागवड अन्यत्र करणे या प्रक्रीयेमध्ये रोपांची मर्तूक मोठ्या प्रमाणात होते असा आजवरचा अनूभव आहे. परंतू फणस, करंज, जांभूळ, आबा यांच्या बीयाच थेट लावल्या तर त्यांची रुजवात पावसाळ््यात ८० टक्के होते, हे निष्कर्श देखील आहेत.