शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा राष्ट्रीय महामार्गावर बीजारोपण

By admin | Updated: June 30, 2016 02:52 IST

१ जुलैला राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला

अलिबाग : कृषीदिनी शुक्रवारी १ जुलैला राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे. याच दिवशी ‘लोकमत’च्या वतीने ‘गोवा राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा बीजारोपण मोहिमेचे’ आयोजन के लेआहे. महामार्गाच्या बाजूच्या राज्यातील पहिल्याच बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी १ जुलै रोजी सकाळी आठ वाजता विसावा (महाड) येथे ेआमदार भरत गोगावले व शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पळस्पे (पनवेल) येथे माजी आमदार विवेक पाटील व व्ही.जी.पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबागचे प्रमुख वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच वेळी होणार आहे. विसावा (महाड) येथील उपक्रमाकरिता सफर केंद्र आणि सावली गोशाला, आसनपोई-महाड आणि शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड या दोन संस्थांचे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी.पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबाग व भारत पेट्रोलियम वैभव आॅटोमोबाईल्स, पळस्पे-पनवेल या दोन संस्थांचे सहकार्य लाभले आहे. ‘लोकमत’नेही गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा आगळी मोहीम हाती घेण्यात आल्याचे कळल्यावर खरंच आनंद वाटला, असे वनस्पती शास्त्र तज्ज्ञ डॉ.अनिल पाटील म्हणाले.>कशी आहे मोहीम...गोव्याकडे खासगी वाहन चालक व त्यातील प्रवाशांना पळस्पे (पनवेल) येथे तर मुंबईकडे जाणाऱ्या खासगी वाहन चालक व त्यातील प्रवाशांना विसावा (महाड) येथे बीजे (बिया) देण्यात येणार आहेत. यामध्ये आंब्याचे बाठे, करंज, जांभूळ, फणस आदि झाडांच्या बियांचा समावेश आहे. प्रवासादरम्यान पळस्पे (पनवेल) ते इंदापूर (महाड) या दरम्यान गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाकरिता संपादित मार्ग जागेच्या बाजूला आपली गाडी सुरक्षित ठिकाणी थांबवून महामार्गाच्या डाव्या बाजूस हे बीजारोपण करुन, प्रवासी पर्यावरण संवर्धनाच्या या राष्ट्रीय कर्तव्यात आपला सहभाग देतील. बीजाचे रुजून त्याचे झाड करण्याचे पुढील काम नैसर्गिकरीत्या पडणाऱ्या पावसाने पूर्ण होणार आहे. बीजारोपण करतानाचा आपला फोटो व्हॉट्सअ‍ॅप द्वारे ८००७८९८००८ या क्रमांकावर हे प्रवासी पाठवून आपल्या सहभागाची खातरजमा देतील. मोहिमेच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता पळस्पे आणि महाड येथे एक माहिती पत्रक ‘लोकमत’च्या वतीने बियांसोबत देण्यात येणार आहे.