शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांचे दर ४५ टक्क्यांनी वाढले!

By admin | Updated: June 10, 2016 02:08 IST

शेतक-यांवर पुन्हा आर्थिक संकट; मृग नक्षत्रातील पाऊस मात्र दिलासादायक!

राजरत्न सिरसाट/अकोला वळवाच्या पावसानंतर मृग नक्षत्रातील मॉन्सूनपूर्व पावसाने राज्यातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांनी याहीवर्षी सोयाबीन, कापूस पेरणीवर भर दिला आहे. पण, खासगी आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) दर ३५ ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढल्याने दुष्काळात आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकर्‍यांसमोर संकट उभे ठाकले आहे.मागील पाच-सहा वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना २0१५-१६ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थिताला सामोरे जावे लागले. उत्पादन आणि उत्पन्नही घटल्याने शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना सवलती देण्यात येतात, बियाण्यांवर अनुदान दिले जाते; ते तर मिळालेच नाही, उलट महाबीज बियाण्यांचे दर ५ ते ३५ टक्के वाढल्याने शेतकर्‍यांवर संकटच कोसळले आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे मागील वर्षी ६२ रुपये किलो होते, ते यावर्षी ६८ रुपये किलो झाले आहे. तूर, मूग, उडिदाचे बियाणे ३५ टक्क्यांनी वाढले आहे. खासगी बाजारात तर हे दर अव्वाच्या सव्वा झाले असून, ३५ ते ४५ टक्के अतिरिक्त दराने शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करावे लागत आहे.बाजारात आजमितीस कडधान्य, तेलवर्गीय धान्य तसेच डाळवर्गीय धान्याचे भाव वाढलेले आहेत. त्याचाच अप्रत्यक्ष परिणाम बियाणे दरावर होत असल्याची सबब महाबीजतर्फे मांडण्यात येत आहे. प्रत्यक्षात महाबीजचे दर निश्‍चित झाल्याशिवाय खासगी कंपन्या त्यांचे दर निश्‍चित करीत नाहीत. महाबीजचे दर घोषित झाल्यानंतर खासगी बाजारातील दर वाढले आहेत. राज्यात २0 लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज आहे. महाबीजने केवळ चार ते साडेचार क्विंटल बियाण्यांची तजवीज केलेली आहे. उर्वरित १६ लाख क्विंटल बियाणे शेतकर्‍यांना बाजारातूनच खरेदी करावे लागणार आहेत. महाबीजने तूर, मूग, उडीद बियाण्यांच्या दरात ३५ टक्क्याच्यावर वाढ केली आहे. खासगी बाजारात हे दर ४५ टक्क्यांपर्यंंत वाढले आहेत. या परिस्थितीत दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांनी दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बीजोत्पादक शेतकर्‍यांना प्रोत्साहन राशी!शेतकर्‍यांच्या शेतावर महाबीजतर्फे बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. त्यामुळे बीजोत्पादक शेतकर्‍यांकडून बियाणे खरेदी करताना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संबंधित धान्याचे दर विचारात घेऊन, त्यावर शेतकर्‍यांना किमान २0 ते २५ टक्क्यापर्यंत प्रोत्साहन राशी देण्यात येत असल्याचे महाबीजकडन स्पष्ट करण्यात येत आहे.