शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बाजारात बियाण्याचे दर ४५ टक्क्यांनी वाढले!

By admin | Updated: June 25, 2016 02:29 IST

महाबीजने दिली तूर, मूग, उडीद बियाण्यावर दिली सवलत; कापूस, सोयाबीनचे काय?

अकोला: यावर्षी मृग नक्षत्रातील पावसाचे स्वरूप सार्वत्रिक नसले तरी राज्यातील शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली असून, शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू झाली आहे, पण महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) व खासगी बाजारातील सोयबीन आणि कापसाचे दर शेतक र्‍यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने ते हवालदिल झाले आहेत. राज्यात खरिपातील एकूण पेरणीलायक क्षेत्रापैकी ८0 ते ९0 लाख हेक्टर क्षेत्र हे सोयाबीन व कापसाखाली आहे. असे असताना महाबीजने केवळ मूग, उडीद व तूर बियाण्याचे दर कमी केले आहेत.मूग, उडीद ही संवेदशील आणि कमी कालावधीची पिके असल्याने त्यांची पेरणी ही ३0 जूनपर्यंत केली जाते. यावर्षी जून महिना संपत आला आहे, हे वास्तव महाबीजला माहिती आहे. असे असताना या न पेरणी होणार्‍या बियाण्याचे दर कमी करू न महाबीज व शासनाने नेमके काय साधले, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.यावर्षी महाबीजने सोयाबीन बियाण्यावर १0 टक्के वाढ केली असून, महाबीजचे सोयाबीनचा प्रतिकिलो दर ६८ रुपये, तर खासगी कंपन्याचे दर हे ७0 ते ७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. महाबीजची तूर सवलतीत १२0 रुपये प्रतिकिलो, तर खासगी बाजारात दर ३५0 रुपये प्रतिकिलो आहे. महाबीजचे मूग बियाणे २१0 रुपये, तर खासगीमध्ये ३00 ते ४00 रुपये प्रतिकिलो दर आहे. महाबीजच्या उडीद बियाण्याचा दर १२0 रुपये, तर खासगी दर प्रतिकिलो ३२0 रुपये आहे. राज्याला लागणारे सर्वच व पूरक प्रमाणात बियाणे महाबीज देऊ शकत नसल्याने, शेतकर्‍यांना खासगी बाजारातूच बियाणे खरेदी करावे लागत असल्याने पेरणीसोबतच त्यांच्यापुढे बियाण्याच्या महागाईचे संकट वाढले आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना २0१५-१६ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. उत्पादन आणि उत्पन्नही घटल्याने शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना सवलती देण्यात येतात. बियाण्यावर अनुदान दिले जाते. ते तर मिळाले नाहीच, उलट महाबीज बियाण्याचे दर ५ ते ३५ टक्के वाढल्याने शेतकर्‍यांवर संकटच कोसळले आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे मागील वर्षी ६२ रुपये किलो होते, ते यावर्षी ६८ रुपये किलो झाले आहे.