पुणे : घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मराठी रसिक किती येतील, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच साहित्यप्रेमींना संगणकाच्या माध्यमातून घरबसल्या या संमेलनाचा आस्वाद घेता येणार आहे. ई-संमेलनाद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे अनावरण मंगळवारी नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ई-संमेलनाविषयीची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भरत देसडला यांनी दिली. ६६६.२ंँ्र३८ं२ेंी’ंल्लॅँ४ेंल्ल.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर घुमानमधील नामदेवांचे कार्य, साहित्य संमेलन, महामंडळ, साहित्य परिषद यांसह आजवरच्या साहित्य संमेलनांचा इतिहास, संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष यांचा संदर्भासहित इतिहास उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वेळी सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य उपस्थित होत्या. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या ‘घुमान’विषयी रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे घुमान व परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती देण्याबरोबरच साहित्य संमेलनासाठी नावनोंदणी, नोंदणीचे अर्ज, नियम व अटी, संपर्कासाठी माहिती, सरहद व महामंडळ कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक यांचाही समावेश संकेतस्थळावर करण्यात आला आहे.४अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संमेलनाचे जाळे जगभरात पोहोचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे. याशिवाय लॅपटॉप, मोबाईल, टॅब आदी माध्यमातून ई-संमेलन रसिकांना पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे भरत देसडला यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावहारिक कारणांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध होत होता. मात्र नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा विधायक कामांसाठी झाला पाहिजे ही गोष्ट घुमान संमेलनाने दाखवून दिली आहे. १६व्या शतकातले संत नामदेव आणि २१वे आधुनिक शतक परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम मिलाफ संमेलनात पाहायला मिळत आहे. एकमेकांना शह-प्रतिशह देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. - डॉ. सदानंद मोरे, नियोजित संमेलनाध्यक्ष
घरबसल्या बघा साहित्य संमेलन
By admin | Updated: December 31, 2014 00:22 IST