शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकडे व्यवसाय म्हणून पहा - जैन

By admin | Updated: August 23, 2015 00:34 IST

कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी शेतकरी वर्गाने खचून जाता कामा नये. उलटपक्षी उमेदीने कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करावेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांनी नव्या

मुंबई : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी शेतकरी वर्गाने खचून जाता कामा नये. उलटपक्षी उमेदीने कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करावेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांनी नव्या प्रयोगांकडे लक्ष द्यावे आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे, असे आवाहन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले.परेल येथील आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अनिल जैन बोलत होते. ते म्हणाले की, गरिबीमुळे देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होते आहे. शिवाय अनियमित पावसामुळे कृषी क्षेत्रावर संकट आले आहे. परिणामी शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान होते आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी वर्गाने ठिबक सिंचन राबविले पाहिजे. कारण ठिबक सिंचनामुळे पाण्याची ६५ टक्के बचत होते. आणि त्याचा फायदा शेतकरी वर्गाला होतो.विशेष म्हणजे ओनर प्रोफेशनल आॅन लाईन पद्धतीने शेती केली आणि राईट प्रॅक्टीस टेक्नोलॉजीचा वापर केला तर उत्तम फायदा होऊ शकतो. आम्ही असेच तंत्रज्ञान शेतकरी वर्गासमोर सादर करत असून, छोटे शेतकरी कसे फायद्यात येतील, यावर आमचा भर आहे. शिवाय ऊस, कापूस आणि केळी यासारखी उत्पादने वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याबाबतची जनजागृती अधिक व्हावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांची मदत घेत आहोत. सहा शाळांतील आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शेती कशी करावी, त्याकडे कसे वळावे याबाबतचे मार्गदर्शन केले जाते आहे. कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान कसे वापरता येईल, याबाबतची माहिती दिली जात आहे.केवळ शेतीसाठी शेती नाही तर एक व्यवसाय म्हणून उभारीला यावा, हा उद्देश आहे. शिवाय शेतकरी वर्गाला मदतीसाठी कंपनीने अडीच हजार एकर जागेवर कृषी क्षेत्रातील निरनिराळे प्रयोग सुरु केले आहेत. आणि त्या माध्यमातून कृृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम सुरु आहे. तसेच विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांसोबत कृषी क्षेत्राला वाव देण्यासाठी कार्य सुरु असल्याचेही जैन यांनी आर्वजून नमुद केले. (प्रतिनिधी)