शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी सुरक्षारक्षकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटना; उद्यापासून आझाद मैदानात एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विविध आस्थापनांत काम करणाऱ्या खासगी सुरक्षारक्षकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटनेने येत्या मंगळवार, दिनांक ५ जानेवारीपासून  आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.‘सुरक्षारक्षकांच्या समस्या आम्ही वेळोवेळी शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असून, दर वेळी आश्वासनांपलीकडे प्रकरण जातच नाही. वेतनवाढ प्रलंबित आहे, सुरक्षारक्षकांच्या पगारातून कापून घेतलेल्या रकमेचा भरणा भविष्य निर्वाह निधीत न होता, ती रक्कम दुसरीकडेच वळवली जाते, राज्यातील खासगी सुरक्षारक्षकांच्या नोकरीचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक अधिनियमन १९८१ कायदा लागू करण्यात आलापण, त्याची नीट अंमलबजावणी होत नाही. म्हणून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी सोनावणे यांनी ‘लोकमत’ला दिली.गेल्या  दिनांक १६ डिसेंबर रोजी संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री, कामगार प्रधान सचिव व कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. राज्यातील १५ सुरक्षारक्षक मंडळे एकत्र करावीत, सर्व सुरक्षारक्षकांना लष्कराप्रमाणे एकच गणवेष देण्यात यावा, सुरक्षारक्षकांचा जमवलेला निधी भविष्य निर्वाह निधीतच जमा करण्यात यावा, शासनाच्या समितीवर उच्च शिक्षित सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, सुरक्षारक्षकांच्या नावापुढील ‘टेम्पररी’ हा शब्द काढून त्यांना कायमस्वरूपी नोदणी क्रमांक देण्यात यावा, सर्व मंडळांतील प्रतीक्षा यादी संपुष्टात आणावी आणि ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांचे थकीत वेतन तत्काळ देण्यात यावे, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

परस्पर भरती केल्याचा आरोप सर्वच ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळातर्फे सुरक्षारक्षक तैनात केले जात नाहीत. मंडळाकडे मुंबई व ठाण्यात जवळजवळ ३२०० आस्थापनांची नोंद आहे. मात्र, यातील बऱ्याच आस्थापनांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून सुरक्षारक्षकांची परस्पर भरती केल्याचा आरोप अश्विनी सोनावणे यांनी केला.