शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांची सुरक्षा घेतली परत

By admin | Updated: May 21, 2016 06:06 IST

बिल्डरांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर आणि संभाव्य धोक्याची समीक्षा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी चाळीसपेक्षा अधिक बिल्डरांना पुरविलेली सुरक्षा काढून घेतली

डिप्पी वांकाणी,

मुंबई- बिल्डरांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर आणि संभाव्य धोक्याची समीक्षा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी चाळीसपेक्षा अधिक बिल्डरांना पुरविलेली सुरक्षा काढून घेतली आहे. 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार 'एचडीआयएल'चे वाधवा, लोढा समूहाच्या मंगलप्रभात लोढा यांची दोन मुले, तसेच लोखंडवाला, विनोद गोएंका आणि डी.बी. रिअल्टीचे शाहीद बलवा यांचा या यादीत समावेश आहे. या बिल्डरांना सरकारकडून नॉन कॅटेगरीतून पुरविलेल्या सुरक्षेसाठी दरमहा प्रति बिल्डर एक लाख रुपये खर्च येत आहे. अर्थात ज्या बिल्डरांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे, त्यात प्रामुख्याने मंगलप्रभात लोढा आणि नुस्ली वाडिया यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या एका समितीने बिल्डरांच्या सुरक्षेचा हा आढावा मार्चमध्ये घेतला. सुरक्षा काढण्यात आलेल्यांमध्ये राकेश, धीरज, कपिल आणि सारंग वाधवा हे एचडीआयएल समूहाचे सदस्य आहेत. अभिषेक आणि अभिनंदन लोढा यांचीही सुरक्षा काढण्यात आली. ज्या चाळीस बिल्डरांची सुरक्षा काढून घेण्याचे ठरले, त्यात गौरव पोरवाल, युनिटी एन्फ्राचे अवरसेकर, गुलाम रस्सीवाला, पिरामल, कांचवाला समूह, सूरज मुचाला, युसूफ शेख, गणेश गुप्ता आणि सेठी समूहाच्या मालक आहेत. मुंबई पोलिसांकडून यापूर्वी तीन डझन कलाकारांना सुरक्षा होती. ही संख्या १५ वर आली आहे.>पुनर्परीक्षण करून अहवालपोलिसांचे वेगवेगळे विभाग या धोक्याबाबत पुनर्परीक्षण करतात. त्यानंतर हा अहवाल समितीसमोर सादर केला जातो. त्यावर ही समिती सुरक्षा कायम ठेवायची अथवा नाही याबाबत निर्णय घेते. लोकमतने जानेवारीत याबाबत वृत्त दिले होते की, शाहरुख खान आणि आमिर खान यांची सुरक्षा कशा प्रकारे घटविण्यात येत आहे. त्यांना पुरविलेले एस्कॉर्ट वाहन काढून घेण्यात येत आहे.