शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दारूकांडाच्या गुन्ह्यात हत्येचे कलम

By admin | Updated: July 11, 2015 02:21 IST

मालवणी दारूकांडातील आरोपींविरोधात शुक्रवारी गुन्हे शाखेने हत्या व हत्येचा प्रयत्न ही कलमे वाढवली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप

मुंबई : मालवणी दारूकांडातील आरोपींविरोधात शुक्रवारी गुन्हे शाखेने हत्या व हत्येचा प्रयत्न ही कलमे वाढवली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी दंडाधिकारी न्यायालयाला दिली. न्यायालयाने सर्व आरोपींना २४ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात हत्येचे कलम वाढविण्याबाबत काही दिवसांपासून कायदेशीर बाबी चाचपल्या जात होत्या तर दुसरीकडे भक्कम पुराव्यांचा शोधही सुरू होता. अखेर, आरोपींनी कट रचून दारूकांडात ठार झालेल्यांची हत्या केली हा आरोप स्पष्ट करणारे पुरावे हाती आले. त्यामुळे ही गंभीर कलमे वाढवण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला दिली.या गुन्ह्यात अटक आरोपी फ्रान्सीस डीमेलो याच्या घरातून गुन्हे शाखेने सुमारे हजार लीटर विषारी दारू हस्तगत केली होती. त्यातील नमुन्यांची तपासणी केली असता ही गावठी दारू नसून त्यात ९६ टक्के मिथेनॉल असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. गावठी समजून मिथेनॉल पिणारा दगावू शकतो, हेही त्यांना माहीत होते. त्यामुळे यातून आरोपींचा हेतू सिद्ध होतो, असा दावा गुन्हे शाखा करते. (प्रतिनिधी)