शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महिला व बाल विकास विभाग सचिव हाजिर हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:32 IST

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईच्या बाल सुधारगृहातून गेल्या तीन वर्षांत ४२ मुले हरविल्याचे विधीमंडळात सांगितल्यानंतर उच्च न्यायालयाने महिला व बाल कल्याण विभागाच्या

मुंबई : महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईच्या बाल सुधारगृहातून गेल्या तीन वर्षांत ४२ मुले हरविल्याचे विधीमंडळात सांगितल्यानंतर उच्च न्यायालयाने महिला व बाल कल्याण विभागाच्या(डब्ल्युसीडी) सचिवांना हजर राहण्याचा आदेश सोमवारी दिला.डोंगरी बाल सुधारगृहात झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी डब्ल्युसीडीच्या सचिवांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. आरोपींवर काय कारवाई करण्यात आली, यासंबंधी प्रतिज्ञापत्रात काहीच उल्लेख करण्यात आला नाही.त्यामुळे सचिवांनी स्वत: उपस्थित राहून याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असे न्यायालयाने म्हटले.डोंगरी बाल सुधारगृहातील भ्रष्टाचाराबाबत कोलकात्याच्या माजी मुख्य न्यायाधीशांनी मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहीले. या पत्राचे जनहित याचिकेत रुपांतर करण्यात आले. गेल्या सुनावणीत न्यायालयाने याबाबत सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, काही आरोपींना ‘कारणे- दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.चौकशी सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितल्यावर न्यायालयाने कोणत्या प्रकारची चौकशी करत आहात? केवळ आश्वासनांवर भागणार नाही, असे म्हणत सचिवांनाच पुढील सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.