शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सचिवालय १ डिसेंबरला येणार

By admin | Updated: November 14, 2014 00:52 IST

देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ८ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार असून त्यासाठी १ डिसेंबरला

८ डिसेंबरपासून अधिवेशन : २८ नोव्हेंबरपर्यंत वाहने मागविलीनागपूर : देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ८ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार असून त्यासाठी १ डिसेंबरला सचिवालय नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहन व्यवस्थेची तयारी सुरू झाली आहे.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारपुढे विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित करण्याचे आव्हान होते. मुंबईत झालेल्या विशेष अधिवेशनात सरकारने आवाजी मताने हा ठराव पारित करून पहिली खेळी जिंकली. आता खऱ्या अर्थाने दुसऱ्या खेळीला नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सुरुवात होणार आहे. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख (८ डिसेंबर २०१४) जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर अधिवेशनाच्या तयारीला वेग आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २८ नोव्हेंबरपासून सचिवालयातील कर्मचारी येण्यास सुरुवात होणार असून १ डिसेंबरपासून सचिवालयाचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार वाहन व्यवस्थेचे नियोजनही सुरू करण्यात आले आहे. नागपूरमध्ये येणारे मंत्री, राज्यमंत्री, सचिवपातळीवरील अधिकारी, महामंडळांचे अध्यक्ष आणि इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वाहन व्यवस्था करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त कार्यालयाची असते. त्यासाठी दरवर्षी राज्यातील (मुंबई, कोकण महसूल विभाग वगळून) शासकीय वाहनांचे अधिग्रहण केले जाते. (प्रतिनिधी)दोन हजार वाहनांची मागणीसरासरी दोन हजार वाहनांची मागणी नोंदविण्यात येते. प्रत्यक्षात १००० ते १२०० वाहने उपलब्ध होतात. त्यातून मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांचे वाटप केले जाते. त्यात सामान्यपणे कार, जीप्सचा समावेश अधिक असतो. सामानांच्या वाहतुकीसाठी व कर्मचाऱ्यांसाठी जीप, ट्रक, बसही मागविली जाते. यंदाही गतवर्षीप्रमाणेच वाहनांची मागणी विविध शासकीय कार्यालयांकडे करण्यात येणार असून त्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत वाहने नागपूरला पोहचतील अशा बेताने पाठवावीत असे पत्र पाठविण्यात आले आहे. अधिवेशन तीन आठवडे किवा एक महिना चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे.