शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात रंगले दुसरे गोल रिंगण

By admin | Updated: June 28, 2017 01:42 IST

आभाळाला साक्षी ठेवत मंगळवारी दुपारी एकच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर (जि. पुणे) : आभाळाला साक्षी ठेवत मंगळवारी दुपारी एकच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या मैदानात संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचा अश्व रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पांढऱ्या ढगांमध्ये काळ्या ढगांची झालेली पेरणी, हवेत बराचसा उष्मा, सभोवार भाविकांची गर्दी आणि भुईवरच्या लाल मातीत खुरांचे ठसे उमटवत वाऱ्याच्या वेगाने दौडणारे दोन कृष्णरंगी अश्व, सभोवती फडफडणाऱ्या पताका... ग्यानबा-तुकारामाचा अखंडित उद्घोष, साथीला टाळ-चिपळ्या व मृदंगाची भक्तिभावाला साद घालणारी लय. अशा मंतरलेल्या वातावरणात हे तालुक्यातील दुसरे अश्वरिंगण रंगले.सकाळी साडेअकराच्या सुमारास इंदापूर बारामती रस्त्याने प्रथमत: संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीच्या नगारखान्याचे रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आगमन झाले. सव्वाबारा वाजता पालखीचा रथ आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, आदींनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखीचा रथ रिंगणातून फिरवण्यात आला. हर्षवर्धन पाटील यांनी रथाचे सारथ्य केले. पूजा झाल्यानंतर प्रत्यक्षात रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम झेंडेकरी, त्यानंतर तुळशीवाल्या महिलांची दौड झाली. त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्वरिंगणाचा सोहळा झाला. त्यानंतर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात आणण्यात आली. तेथे पालखीच्या दर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटल्याचे चित्र दिसत होते.निळोबाराय पालखी पहिल्यांदाच वारीतहजारो भाविकांची मांदियाळी, फुलांचा वर्षाव आणि संत तुकाराम महाराज यांच्यावर संत निळोबाराय यांनी रचलेल्या अभंगाची कवने सादर केल्याने झालेले भक्तीमय वातावरण आणि फुलांचा वर्षाव व दोन्ही संतांच्या पादुका एकाच ठिकाणी आल्यावर ‘एकोबा, तुकोबा, निळोबा’ च्या रंगलेल्या जयघोषात संत तुकाराम महाराज व संत निळोबाराय यांच्या पालखीचा भेटीचा ऐतिहासिक सोहळा इंदापुरात रंगला़ संत परंपरेतील शेवटचे संत समजले जाणारे संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळयाचा इतिहासात पहिल्यांदाच वारीत समावेश झाला आहे़ जगदगुरू संत तुकाराम महाराज यांना गुरू मानून निळोबा गाथा लिहिणाऱ्या संत निळोबारायांनी श्री क्षेत्र पिंपळनेर येथे समाधी घेतली.