शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर दुसऱ्यांदा बलात्कार

By admin | Updated: July 11, 2015 02:13 IST

जेरबंद करण्यासाठी सापळा रचलेला असताना पोलिसांसमोरच अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री उशिरा

जालना : जेरबंद करण्यासाठी सापळा रचलेला असताना पोलिसांसमोरच अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री उशिरा जालन्यात घडली़ याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, दोन्ही तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मित्रासह नाव्हा बायपास रस्त्यावर फिरायला गेलेल्या साडेसतरा वर्षीय मुलीवर दोन तोतया पोलिसांनी सोमवारी रात्री अत्याचार केला होता़ पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री पिडीत मुलीचा मोबाईल घटनास्थळी राहिला होता़ तो परत देण्यासाठी या नराधमांनी पिडीत मुलीच्या आईच्या मोबाईलवर संपर्क साधत दोन हजारांची खंडणी मागितली. आईने याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन गुरुवारी सापळा लावला. मात्र, ते पोलिसांच्या हाती लागले नाही. पुन्हा त्याच रात्री दोघांनी पिडीत मुलीच्या आईशी संपर्क साधून मोबाईल घेण्यासाठी अंबड चौफुलीजवळील रेल्वे उड्डाणपूल परिसरात बोलावले. त्यामुळे पोलिसांनी त्याच रात्री पुन्हा सापळा रचला. त्यानुसार मुलीला मंठा चौफुलीहून स्कुटीवर पाठविण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मुलगी उभी असताना दोन्ही नराधमांनी तिला जवळच्या नाल्यात नेऊन अत्याचार केला. पिडीत मुलगी ओरडत आल्याने हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला, मात्र तोपर्यंत दोन्ही नराधमांनी धूम ठोकली. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, आरोपींनी नियोजित ठिकाणी येण्यापूर्वीच मुलीला गाठून रेल्वे उड्डाणपुलाखाली बलात्कार केला व नंतर तिला रस्त्यावर सोडून दिले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी सकाळीच जालना गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्रीच रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपींना जेरबंद केल्याची माहिती नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ तर सापळा लावलाच नव्हता. रात्री ८.३० च्या सुमारास तिच्या नातेवाईकांनी मला माहिती दिली. त्यावरून आरोपींना पकडण्यासाठी आपण वरिष्ठांना माहिती देवून सापळा लावणार होतो. मात्र, त्यापूर्वीच ती मुलगी घराबाहेर पडली आणि ही घटना घडली, असे स्पष्टीकरण विशेष कृृती दलाचे प्रमुख विनोद इज्जपवार यांनी दिले आहे़ (प्रतिनिधी)