शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

थ्री-जी सेवेत गडचिरोली जिल्हा राज्यात द्वितीय स्थानी

By admin | Updated: November 4, 2015 02:23 IST

बीएसएनएलच्या वतीने जिल्ह्यातील बाराही तालुकास्थळांवर थ्री-जी सेवा लावण्यात आली असून प्रत्येक तालुकास्थळ थ्री-जी सेवेने जोडण्यात आलेला पुण्यानंतर गडचिरोली

- दिगांबर जवादे,  गडचिरोलीबीएसएनएलच्या वतीने जिल्ह्यातील बाराही तालुकास्थळांवर थ्री-जी सेवा लावण्यात आली असून प्रत्येक तालुकास्थळ थ्री-जी सेवेने जोडण्यात आलेला पुण्यानंतर गडचिरोली हा राज्यात दुसरा जिल्हा ठरला आहे. प्रत्येक युवक व नागरिकांच्या हातामध्ये स्मार्ट फोन आला आहे. मोबाईलच्या साहाय्याने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणे अगदी सामान्य बाब झाली आहे. या सर्वांचा वापर चांगल्या पद्धतीने होण्यासाठी इंटरनेटची स्पिड असणे अत्यंत गरजेचे आहे. इंटरनेट स्पिडसाठी थ्री-जी सेवा असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन बीएसएनएलसह सर्वच खासगी दूरसंचार कंपन्यांनी थ्री-जीची यंत्रणा बसविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. मात्र बीएसएनएलची थ्री-जी सेवा राज्यातील बहुतांश तालुकास्थळांपर्यंतही पोहोचलेली नाही. मागास व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यावर बीएसएनएलने विशेष मर्जी दाखविली आहे. प्रगत असलेल्या अनेक तालुकास्थळांवर व मोठ्या शहरांमध्ये थ्री-जी यंत्रणा लावण्यात आली नसली, तरी गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुकास्थळे थ्री-जी यंत्रणेने जोडण्यात आली आहेत. बीएसएनएलने सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुकास्थळांवर थ्री-जी यंत्रणा लावली होती. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील तालुकास्थळांवर थ्री-जी यंत्रणा लावण्याचे काम सुरू केले. दोन महिन्यांपूर्वी सर्वच तालुकास्थळे थ्री-जी यंत्रणेने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहकही बीएसएनएलला विशेष पसंती देत असल्याचे दिसून येते.