शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आठ शहरे दुसऱ्या टप्प्यात ‘स्मार्ट’

By admin | Updated: January 31, 2016 01:46 IST

स्मार्ट सिटीजच्या निवडीत पहिल्या यादीत महाराष्ट्रातील दहापैकी पुणे आणि सोलापूर शहरांचा क्रमांक लागल्याने उर्वरित आठ शहरांची निवड दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

स्मार्ट सिटीजच्या निवडीत पहिल्या यादीत महाराष्ट्रातील दहापैकी पुणे आणि सोलापूर शहरांचा क्रमांक लागल्याने उर्वरित आठ शहरांची निवड दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. स्मार्ट सिटीजच्या दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत देशातील ५४ व महाराष्ट्रातील ८ शहरांचा समावेश असून, १ एप्रिल २0१६ रोजी ही स्पर्धा सुरू होईल. त्यासाठी शहरांना विकास योजना व प्रकल्प ३0 जूनपर्यंत नव्याने सादर करायचे आहेत. दुसऱ्या टप्प्याचा निकाल आॅगस्टमध्ये लागेल आणि ५४ पैकी अंदाजे ४0 शहरांची स्मार्ट सिटीजसाठी निवड होईल. स्मार्ट सिटीजसाठी ९७ स्पर्धक शहरांचे गुणवत्तेनुसार मूल्यमापन जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, लंडन स्कूला आॅफ इकॉनॉमिक्स, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अर्बन अ‍ॅफेअर्स आदी संस्थांच्या तज्ज्ञांनी काटेकोर निकषांवर व पारदर्शी पद्धतीने केले. त्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या २0 शहरांची पहिल्या टप्प्यात निवड झाली. अन्य स्पर्धक शहरांनाही त्यांच्या १00 पैकी गुण व क्रमांक देण्यात आले. पहिल्या २0 शहरांना २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून स्मार्ट सिटीज मिशनतर्फे नियोजित विकासासाठी आर्थिक सहाय्य सुरू होईल. त्या शहरांच्या विकासाचा अग्रक्रम, तज्ज्ञांच्या सूचना व सल्ल्यानुसार ठरेल. नियोजित वेळेत त्याची पूर्तता महापालिकांना करावी लागेल. स्मार्ट सिटीजच्या प्रकल्पांच्या पूर्ण होण्याची मुदत ठरलेली असेल. प्रकल्प अमलबजावणीत विलंब करणाऱ्या शहरांना स्मार्ट मिशनमधून बाहेर काढले जाईल. काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील शहरांना पहिल्या स्पर्धेत संधी मिळाली नाही. त्यामुळे २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील २३ शहरांना प्रस्ताव दुरूस्त करण्यास एक संधी मिळेल. राज्यातील ८ शहरांचा क्रमांक व गुण शहरक्रमांक गुणनागपूर ३१ ५३%नाशिक ३४ ५२.७५%ठाणे ३६ ५२.३४% कल्याण-डोंबिवली३८ ५२.३0% मुंबई ४३५१.७७% नवी मुंबई४५ ५१.६८%अमरावती ६४४५.५७%औरंगाबाद ७७४५.७0%20 शहरांची निवड पहिल्या टप्प्यात निवड झाली, त्यात निवड झालेल्या पुणे आणि सोलापूर या दोन शहरांनी अनुक्रमे ७७.४२ टक्के आणि ६0.८३ टक्के गुण मिळवून दुसरा आणि नववा क्रमांक पटकवला होता.