शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा

By admin | Updated: January 14, 2015 00:13 IST

ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न

अकोला: महावितरणच्या वतीने गत दोन वर्षांमध्ये पायाभूत सुविधा आराखडा राबविण्यात आला. या उपक्रमाचा पहिला टप्पा डिसेंबर २0१४ मध्ये संपला, तर जानेवारी २0१५ पासून दुसर्‍या टप्प्याला सुरूवात झाली. ग्राहकांना चांगल्या दर्जाची, व्यवस्थित सेवा मिळावी, यासाठी जानेवारी २0१५ पासून पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. महावितरणने आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात वितरण यंत्रणेचे बळकटीकरण केले. यादरम्यान पुर्नरचित गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रम (आयआरडीपी) राबविण्यात आला. या योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे ग्राहकांना दिल्या जाणार्‍या सेवांची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली. याशिवाय वीज हानीवर आधारीत भारनियमनाचा फॉर्म्युला महावितरणने अंमलात आणला. वितरण हानी आटोक्यात आणली, गावठाण फिडर सेपरेशन योजना आणि सिंगल फेजिंग योजनेव्दारे भारनियमनाचे प्रभावी व्यवस्थापन केले. गत पाच वर्षात महाराष्ट्रात १0 लाखांपेक्षा जास्त कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या. पायाभूत आराखडा अंतर्गत राज्यात वीज वितरण हानी कमी करणे, ग्राहकांना ऑनलाईन सुविधा पुरविणे, यासाठी महावितरणने अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे विविध उपाययोजना केल्या. पहिला टप्पा संपल्यानंतर जानेवारी २0१५ मध्ये दुसर्‍या टप्प्याला सुरूवात होणार आहे. यामध्ये स्थिरता आणि विश्‍वासार्हता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच इन्फ्रारेड मीटर, प्रीपेड मीटर जास्तीत जास्त प्रमाणात देण्यावर भर देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राबविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.*वीजपुरवठय़ाकडे लक्ष पायाभूत आराखड्यानुसार आगामी वर्षात जास्तीत जास्त ग्राहकांना वीज पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. महावितरणचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत असून, विजेची मागणीही वाढत आहे. त्यानुसार वीजपुरवठय़ाचे नियोजन करण्यात येणार आहे. महावितरणने ५ ऑक्टोबर २0१४ रोजी तब्बल ३६४.५७ दशलक्ष युनीट वीज पुरवठा करण्याचा विक्रम केला होता. तत्पूर्वी २९ सप्टेंबर २0१४ रोजी महावितरणने ३६२ दशलक्ष युनीट वीज पुरविली होती. यावर्षी वीज पुरवठय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.