शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

दुसरी नोटीस दिली, जिप्सम बंद होणार?

By admin | Updated: January 17, 2017 03:42 IST

नारे गावातील जिप्सम कंपनीने केलेला खुलासा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमान्य केला असून उत्पादन बंद का करू नये

वाडा : या तालुक्यातील नारे गावातील जिप्सम कंपनीने केलेला खुलासा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमान्य केला असून उत्पादन बंद का करू नये, अशी दुसरी नोटीस बजावली आहे. तिचे उत्तर देण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जे हे उत्तर समाधानकारक नसेल तर कंपनीतील उत्पादन बंद केले जाऊ शकते. कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणाविषयी ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मंडळाने पाहणी करून कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तिचा केलेला खुलासा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमान्य केला असून तिला दुसरी नोटीस बजावली आहे. वाडा तालुक्यातील नारे ग्रामपंचायत हद्दीत सेंट गोबेन (जिप्सम) ही जिप्सम शीट्स व पावडर बनविणारी कंपनी असून या कंपनीमुळे पाणी, हवा व जमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या विरोधात ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्र ार केली होती. तिची दखल घेऊन मंडळाने दि. ३० डिसेंबर २०१६ रोजी आपल्या अधिकाऱ्यांमार्फत कंपनीची प्रत्यक्ष पाहणी केली असता कंपनी जलप्रदूषण , हवा प्रदूषण, धोकादायक वस्तूंची विल्हेवाट लावणे या कायद्यांतील तरतूदींचे उल्लंघन करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि. ३ जानेवारी रोजी कंपनीला नोटीस बजावून ४८ तासांत खुलासा देण्याचे आदेश दिले होते. याविषयी कंपनी व्यवस्थापनाने ७ जानेवारी रोजी दिलेल्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी पुन्हा दि. १० जानेवारी रोजी पाहणी केली असता कंपनी प्रदूषण विषयक नियमांचा भंग करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा एकदा कंपनीला सात दिवसांची नोटीस बजावून कंपनीचा परवाना रद्द करणे, कंपनीचे उत्पादन थांबविणे व कंपनीचा वीज व पाणी पुरवठा थांबविण्याचे आदेश देण्याचा इशारा दिला आहे.यामुळे कंपनीचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)आम्हाला आमचे गाव प्रदुषण मुक्त करायचे आहे. जिप्सममुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभिर बनला आहे. वारंवार तक्रारी , आंदोलने करुनही महसूल प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत आहेत. - सुधीर पाटील, उपसरपंच, नारे ग्रामपंचायत