शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अभिजात मराठीचा दुसरा शिलालेख

By admin | Updated: June 29, 2015 02:12 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ग्राह्य लिखित पुरावा ठरलेल्या अक्षी-अलिबाग येथील शिलालेखासारखाच दुसरा शिलालेख साताऱ्याजवळील कोरेगावात सापडला आहे.

राजीव मुळ्ये, सातारामराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ग्राह्य लिखित पुरावा ठरलेल्या अक्षी-अलिबाग येथील शिलालेखासारखाच दुसरा शिलालेख साताऱ्याजवळील कोरेगावात सापडला असून, त्यावरील संस्कृतमिश्रित मराठी दहाव्या शतकातील असण्याची शक्यता आहे. तसेच ‘गायवासरू’ आणि ‘गधेगाळ’ ही दोन चिन्हे त्यावर आहेत. त्यामुळे एकाच शिलालेखावर अशी दोन चिन्हे आढळण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरल्याने या ऐतिहासिक ठेव्याचे मूल्य शतगुणित झाले आहे.साताऱ्याच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर हे यश मिळविले आहे. तीळगंगा नदीच्या काठावर केदारेश्वर मंदिर असून, याच ठिकाणचा एक शिलालेख निम्म्याहून अधिक जमिनीखाली गाडला गेला आहे, हे ‘जिज्ञासा’चे विक्रांत मंडपे, नीलेश पंडित, सागर गायकवाड, योगेश चौकवाले, धैर्यशील पवार, शीतल दीक्षित यांना आढळून आले. श्री केदारेश्वर ट्रस्टच्या सहकार्याने या मंडळींनी हा शिलालेख बाहेर काढला. तो एकूण तेरा ओळींचा असून, ‘देवनागरी’मध्ये आहे. यातील ‘ज’ या अक्षराचे वळण दहाव्या शतकातील आहे. या शिलालेखाचे वाचन आणि अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सर्वांत जुना शिलालेख अक्षी-अलिबाग येथे आढळला असून, त्यावरही ‘गधेगाळ’ हे चिन्ह आहे. ते शापवाणीचे निदर्शक असून, ते शिलाहारकालीन चिन्ह आहे. कोरेगावातील शिलालेखाच्या तळातही अशाच प्रकारची ‘गधेगाळ’ चिन्ह असून, येथील अवशेषही शिलाहारकालीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, शिलालेखाच्या वरच्या बाजूला गायवासरू हे चिन्ह आहे. ही चिन्हे एकाच शिळेवर आतापर्यंत कधीच सापडली नव्हती. त्या दृष्टीने या अनमोल ठेव्याचे जतन आणि त्यावर संशोधन व्हावे, अशी ‘जिज्ञासा’ची अपेक्षा आहे.सौम्य-प्रखर चिन्हे एकत्र> ज्येष्ठ इतिहासकार वि.वा. मिराशी यांच्या मते, गाय ही जमिनीचे, तर वासरू हे भोगवटादाराचे प्रतीक आहे. दूध म्हणजे जमिनीचे उत्पन्न. जमीन देवस्थानला दान केली आहे. त्यावर अतिक्रमण होऊ नये, असा या चिन्हाचा अर्थ असून, हे सौम्य चिन्ह मानले जाते. तथापि, अतिक्रमणाची शक्यता अधिक असल्यास ‘गधेगाळ’ किंवा ‘गद्धेगाळ’ हे प्रखर चिन्ह वापरले जात असे.> ‘गाळ’ हा मूळ कन्नड शब्द असून, त्याचा अर्थ शिळा किंवा पट असा आहे. अतिक्रमण करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळेल आणि तो आपल्या आईशी रत होईल, अशी ही शापवाणी आहे. गायवासरू आणि ‘गधेगाळ’ एकाच शिलालेखावर आढळल्याने संशोधकांच्या भुवया उंचावणार आहेत.

-------------या संशोधनामुळे प्राचीन समाजरचना, कायद्यांची रचना आणि सामाजिक उलथापालथीचे आकलन होणार आहे. समकालीन शिलालेख अनेक कारणांनी वाचता येत नाहीत. त्या तुलनेत कोरेगावचा शिलालेख वाचता येण्याजोगा असून, राजाज्ञेचे एक चिन्ह असताना दुसरे का कोरले गेले, याचा अभ्यास केल्यास दहाव्या शतकातील घडामोडींवर प्रकाश पडू शकेल.- नीलेश पंडित, इतिहास अभ्यासक